चेन्नई, 9 एप्रिल : टीम इंडियाचा फास्ट बॉलर आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अव्वल बॉलर जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) नुकतंच टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशनशी (Sanjana Ganesan) लग्न केलं. त्यांचं हनिमूनही झालं पण त्यानंतर मात्र दोघांनाही थोडीशीही उसंत मिळालेली दिसत नाही. कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जसप्रीत 30 मार्चला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये दाखल झाला. तसंच संजनाही स्टार स्पोर्ट्सच्या 18 सदस्यांच्या ब्रॉडकास्टर्सच्या टीममध्ये दाखल झाली. आजपासून आयपीएल सामन्यांना चेन्नईत सुरूवात झाली असून पहिला सामना मुंबईविरुद्ध बेंगळुरू असा आहे. संजनानी नुकताच एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिलं होतं,‘आयुष्यभराच्या आठवणी आणि तेव्हाचा कुणीतरी’या फोटोमध्ये जसप्रीत बुमराह फोटो काढताना दिसत असावा. त्यामुळे त्याने लगेच प्रतिक्रिया दिली,‘त्या फोटोतला फोटोग्राफर खरोखरच चांगला माणूस आहे.’ लगेच संजनानी पण प्रतिक्रिया देत उत्तर दिलंय,‘त्यामुळेच मी त्याच्याशी लग्न केलं.’
आयपीएल 2021 साठी 100 कॉमेंट्रेटर सज्ज माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर, गौतम गंभीरआणि इरफान पठाण हे हिंदीतल्या 9 पॅनलिस्टच्या टीममध्ये असतील. वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली हे दोघं सिलेक्ट डगआउट या पाच विशेष पॅनलिस्टच्या पॅनलमध्ये असतील आणि खेळाचं विश्लेषण करतील. ब्रायन लारा म्हणाला,‘मी डगआउटच्या पॅनलमध्ये परतलो याचा मला आनंद आहे. नवं तंत्रज्ञान आणि नवी संसाधनं यांच्या मदतीने सर्वांत चांगल्या ब्रँडसोबत काम करताना मजा येईल. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांना आणखी काही नवं देता येईल.’ भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला,‘मी हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे. हिंदी कॉमेंट्री दिवसेंदिवस अधिक ऐकली जाते आहे. या आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये खूप चांगला खेळ पहायला मिळणार आहे. प्रत्येक टीमचा एक मंत्र आहे त्यामुळे आणखी मनोरंजन होईल.’ आयपीएलसाठीचे प्रेझेंटर जतीन सप्रू, नेरोली मेडोज, संजना गणेशन, तान्या पुरोहित,अनंत त्यागी, सुरेन सुंदरम, धीरज जुनेजा, भावना बालकृष्णन, नशप्रीत कौर, अनुभव जैन, राधाकृष्णन श्रीनिवासन, मुथुरामन आर, एम. आनंद श्रीकृष्ण, विंध्या मेडापट्टी, नेहा चौधरी, रीना डिसूझा, किरण श्रीनिवास, मधु मैलानकोडी.