JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर, रोहितचा 'विश्वासू' पहिल्या मॅचपासून खेळणार!

IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर, रोहितचा 'विश्वासू' पहिल्या मॅचपासून खेळणार!

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यामध्ये होईल. आयपीएलआधी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) खेळाडूंसाठी खूशखबर आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मार्च : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यामध्ये होईल. आयपीएलआधी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) खेळाडूंसाठी खूशखबर आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धची सीरिज (South Africa vs Pakistan) अर्ध्यातून सोडून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याला परवानगी दिली आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या वनडे सीरिजला 2 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजमध्ये खेळणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू 4 एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या वनडेनंतर आयपीएल खेळण्यासाठी भारतात येऊ शकतील. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये तीन वनडेनंतर चार टी-20 मॅचची सीरिजही होणार आहे. हा दौरा 16 एप्रिलपर्यंत चालणार आहे, तर आयपीएल 9 एप्रिलला सुरू होईल, पण जे खेळाडू आयपीएल खेळणार आहेत, त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 टीममध्ये निवड झालेली नाही. पाकिस्तानविरुद्धची वनडे सीरिज अर्ध्यात सोडून दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतात येतील. आफ्रिकेचे कागिसो रबाडा, (Kagiso Rabada) एनरिच नॉर्किया (Enrich Norkia) दिल्लीकडून, क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) मुंबई इंडियन्सकडून, डेव्हिड मिलर (David Miller) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) कडून, लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)कडून खेळतात. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार फ्रॅन्चायजी या खेळाडूंना चार्टर विमानांनी भारतात आणण्याचा विचार करत आहेत. पाकिस्तानविरुद्धची पहिली वनडे झाल्यानंतर खेळाडूंना भारतात आणण्याचा फ्रॅन्चायजींचा प्रयत्न आहे. बीसीसीआयच्या कोरोना नियमांनुसार जर खेळाडू बायो-बबलमध्ये असेल आणि चार्टर विमानाने आयपीएल खेळण्यासाठी येत असेल, तर त्याला 7 दिवस क्वारंटाईन व्हायची गरज नाही. म्हणजेच खेळाडूंना एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये येण्यासाठी क्वारंटाईनची गरज नाही. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेची सीरिज बायो-बबलमध्येच होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे यावेळचे सगळे सामने 6 शहरांमध्ये खेळवले जातील. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोर, कोलकाता आणि अहमदाबादमध्ये यावेळची स्पर्धा खेळवली जाईल. तसंच यावेळी कोणतीच टीम त्यांच्या घरच्या मैदानात सामना खेळू शकणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या