JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : हे खेळाडू मायदेशी परतले, काही जण अजून भारतातच

IPL 2021 : हे खेळाडू मायदेशी परतले, काही जण अजून भारतातच

आयपीएलच्या (IPL 2021) बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला.

0106

आयपीएलच्या (IPL 2021) बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला. यानंतर काही खेळाडू त्यांच्या मायदेशात परतले आहेत, तर काही अजूनही त्यांच्या घरी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

जाहिरात
0206

आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या इंग्लंडच्या 11 खेळाडूंपैकी 8 खेळाडू बुधवारी मायदेशात परतले. यामध्ये जॉस बटलर आणि जॉनी बेयरस्टो यांचा समावेश आहे. भारताच्या 4 खेळाडूंना कोरोना झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
0306

स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बटलर, बेयरस्टो, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्स, क्रिस वोक्स, मोईन अली आणि जेसन रॉय ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत.

जाहिरात
0406

इंग्लंडच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार इयन मॉर्गन, डेव्हिड मलान आणि क्रिस जॉर्डन पुढच्या 48 तासांमध्ये भारत सोडण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0506

ब्रिटनने कोरोना महामारीमुळे भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे, त्यामुळे खेळाडूंना इंग्लंडला परतल्यानंतर 10 दिवस सरकारने सांगितलेल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

जाहिरात
0606

बीसीसीआयने सगळ्या परदेशी खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचवण्याची हमी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्यांवर 15 मेपर्यंत बंदी घातली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीव किंवा श्रीलंकेमध्ये थांबण्याची शक्यता आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या