मुंबई, 31 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) टीम कसून सराव करत आहे, यामध्ये चेतेश्वर पुजाराचाही (Cheteshwar Pujara) समावेश आहे. सात वर्षांनंतर चेतेश्वर पुजारा आयपीएलमध्ये खेळत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू असलेला पुजारा टी-20 आणि वनडेमध्ये प्रभाव पाडू शकला नाही, पण तरीही चेन्नई सुपरकिंग्जने यंदा पुजारावर विश्वास दाखवला. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुजाराही कसून मेहनत करत आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या नेटमध्ये सराव करतानाचा चेतेश्वर पुजाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मोठमोठ्या सिक्स मारताना दिसत आहे. चेतेश्वर पुजारा त्याचा डिफेन्स आणि ग्राऊंड शॉट्समुळे ओळखला जातो.
चेतेश्वर पुजाराचा हा व्हिडिओ बघितला तर त्याने त्याच्या बॅटिंग स्टाईलमध्येही बदल केला आहे. नेहमी बॅट खाली ठेवून खेळणारा पुजारा या व्हिडिओमध्ये जास्त बॅकलिफ्ट घेऊन खेळताना दिसत आहे, ज्यामुळे शॉट मारायला जास्त ताकद मिळते. पुजाराचं आयपीएल रेकॉर्ड चेतेश्वर पुजाराचं आयपीएल रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. त्याने 30 मॅचमध्ये 20.52 च्या सरासरीने 390 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षाही कमी आहे. आयपीएलमध्ये त्याला फक्त एक अर्धशतक करता आलं आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये पुजाराने एक शतकही केलं आहे. 56 टी-20 इनिंगमध्ये त्याने 1,356 रन केल्या आहेत.