JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : BCCI ने केली आयपीएलच्या तारखांची घोषणा, पहिलाच सामना मुंबईचा

IPL 2021 : BCCI ने केली आयपीएलच्या तारखांची घोषणा, पहिलाच सामना मुंबईचा

2021 सालच्या आयपीएलच्या (IPL 2021 Schedule) तारखांची घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. दोन वर्षानंतर भारतामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च : 2021 सालच्या आयपीएलच्या (IPL 2021 Schedule) तारखांची घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. दोन वर्षानंतर भारतामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम होणार आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यामध्ये यंदाची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. चेन्नईमध्ये आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यात पहिली मॅच होईल. तसंच जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मदी स्टेडियममध्ये प्ले ऑफ आणि आयपीएल फायनल होईल. आयपीएलची फायनल 30 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या मोसमात प्रत्येक टीम 4 ठिकाणी खेळणार आहे. यापैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये प्रत्येकी 10 मॅच होतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये 8 मॅच खेळवल्या जातील. तसंच प्रत्येक सामने हे न्यूट्रल ठिकाणी म्हणजेच कोणत्याच टीमच्या घरच्या मैदानात होणार नाहीत. प्रत्येक टीम लीग स्टेजमध्ये 6 पैकी 4 ठिकाणी खेळतील.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 11 मॅच डबल हेडर असतील. म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने खेळवले जातील. दुपारची मॅच 3.30 वाजता तर संध्याकाळची मॅच 7.30 वाजता सुरू होईल. प्रत्येक टीमला लीग स्टेजमध्ये फक्त तीन वेळाच प्रवास करावा लागणार आहे, अशा पद्धतीने वेळापत्रक आखण्यात आल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. तसंच सुरूवातीला प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळवली जाईल. नंतर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा का नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या