JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 : कोट्यावधींना विकत घेतलेले ‘हे’ 5 स्टार विदेशी खेळाडू खेळणार नाहीत IPL

IPL 2020 : कोट्यावधींना विकत घेतलेले ‘हे’ 5 स्टार विदेशी खेळाडू खेळणार नाहीत IPL

संघांना मोठा झटका! आयपीएल लिलावात विकत घेतलेले हे महागडे खेळाडू खेळणार नाहीत.

0111

मार्चमध्ये सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

जाहिरात
0211

आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल. मात्र याआधीच काही संघांना मोठा झटका बसला आहे. कोट्यावधींना विकत घेतलेले काही खेळाडू आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही आहे.

जाहिरात
0311

आयपीएलआधी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर उजव्या हाताला दुखापतीमुळे आयपीएल 2020 मधून बाहेर पडला आहे.

जाहिरात
0411

राजस्थान रॉयल्सकडून 26 विकेट घेणारा जोफ्रा आर्चर आयपीएल बाहेर पडल्यामुळं त्याच्या संघाला मोठा झटका बसला आहे. जोफ्राच्या उजव्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर आहे, यामुळे तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

जाहिरात
0511

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो. पंजाबने त्याला 7.20 कोटींना विकत घेतले होते. मात्र या आयपीएलमध्ये कुरन खेळू शकणार नाही आहे.

जाहिरात
0611

सॅम चांगल्या फॉर्ममध्ये असून गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र इंग्लंड-श्रीलंका यांच्यात 19-31 मार्च दरम्यान होणाऱ्या मालिकेमुळं सॅम सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे.

जाहिरात
0711

आयपीएलच्या इतिहासात 2018मध्ये पहिल्यांदा एका खेळाडूसाठी लिलावात 12.5 कोटी मोजण्यात आले. हा खेळाडू आहे, राजस्थानचा बेन स्टोक्स. इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवून देणारा स्टोक्सही सुरुवातीचे काही सामने आयपीएल खेळू शकणार नाही आहे.

जाहिरात
0811

19-31 मार्च दरम्यान होणाऱ्या इंग्लंड-श्रीलंका मालिकेसाठी स्टोक्सची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं राजस्थानकडून स्टोक्स सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे.

जाहिरात
0911

राजस्थान रॉयल्सहा आणखी एक झटका बसणार आहे. स्टोक्स आणि आर्चरनंतर जॉस बटलरही आयपीएलचे काही सामने खेळू शकणार नाही आहे. इंग्लंड-श्रीलंका दौऱ्यानंतर त्यांचा पुढचा दौरा वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. त्यामुळं बटलर आयपीएल खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

जाहिरात
1011

आयपीएल 2020मध्ये 10.75 कोटींना ग्लेन मॅक्सवेल या आक्रमक फलंदाजाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतले होते. मात्र मॅक्सवेल आयपीएल खेळू शकणार नाही आहे.

जाहिरात
1111

मॅक्सवेलच्या मॅक्सवेलच्या डाव्या हाताच्या कोपरात दुखापत झाली आहे. त्यामुळं जवळ जवळ 6 ते 8 आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं मॅक्सवेल पंजाबकडून खेळताना सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या