आता सुरेश रैनाच्या जागी संघाचा उप-कर्णधार कोण होणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आयपीएल-2020 (IPL 2020) मधून सुरेश रैनानं माघार घेतल्यानंतर चेन्नई सपरकिंग्ज संघाला मोठा झटका बसला. रैना CSK संघाचा महत्त्वाचा फलंदाज होता, त्याचबरोबर संघाचा उप-कर्णधारही होता. आता सुरेश रैनाच्या जागी संघाचा उप-कर्णधार कोण होणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत.
CSK संघात अनेक अनुभवी खेळाडू आहे. काही खेळाडू पहिल्या सत्रापासून CSK सोबत आहेत. मात्र यातील 4 महत्त्वाच्या खेळाडूंची नावं सध्या आघाडीवर आहेत. या चारही खेळाडूंचे धोनीसोबत चांगले संबंध आहेत.
धोनीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo). ब्राव्होनं 463 टी-20 सामने खेळले आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीसह ब्राव्होनं अनेक सामने चेन्नई संघाला जिंकून दिले आहेत. त्यामुळे रैनाच्या अनुपस्थितीत ब्राव्हो संघाचा उप-कर्णधार होऊ शकतो.
CSK संघाचा सलामीचा फलंदाज शेन वॉटसन धोनीच्या सर्वात भरवशाचा फलंदाज आहे. गेल्या दोव हंगामात वॉटसननं संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये वॉटसनला अनुभवही चांगला आहे. त्यामुळे वॉटसन या हंगामात संघाचा कर्णधार होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसी CSK संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूनं 36 कसोटी, 39 वनडे आणि 37 टी-20 सामने खेळले आहेत. चेन्नईसाठी 63 सामन्यात 1639 धावा केल्या आहेत. डुप्लेसी हा धोनी प्रमाणाचे शांत स्वभावाचा कर्णधार आहे.
दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा CSK संघाच्या उप-कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार आहे. जडेजाला कोणत्याच संघाचे कर्णधारपद देण्यात आले नसले तरी, आयपीएलमधला जडेजा मॅन विनर खेळाडू आहे. याशिवाय रैनानंतर धोनीच्या सर्वात जवळचा खेळाडू जडेजा आहे.