JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / अखेर 12 वर्षानंतर बदलणार RCBचं नशीब! ‘हे’ 3 खेळाडू विराटला करणार IPL चॅम्पियन

अखेर 12 वर्षानंतर बदलणार RCBचं नशीब! ‘हे’ 3 खेळाडू विराटला करणार IPL चॅम्पियन

पहिल्यांदाच विराट होणार IPL चॅम्पियन. हे खेळाडू 12 वर्षांनंतर बदलणार RCBचं नशीब.

019

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल.

जाहिरात
029

आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 हंगामात अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र या संघाचा एकदाही आयपीएल जिंकता आलेले नाही.

जाहिरात
039

रॉयल चॅलेंजर्स संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळं अखेर 12 वर्षांनी बंगळुरू पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज आहे.

जाहिरात
049

बंगळुरू संघाबाबत बोलायचे झाल्यास, या संघाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे विराट कोहली. कर्णधार विराट कोहलीने एकहाती या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
059

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नाही तर आयपीएलही गाजवत आला आहे. विराटनं 177 सामन्यात 37.84च्या सरासरीनं 5412 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळं यंदा विराट आपल्या संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्यास सज्ज आहे.

जाहिरात
069

क्रिकेट जगतातल्या सर्वात अनोख्या खेळाडूबाबत बोलायचे झाल्यास एकच नाव सर्वांसमोर येते. हे नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स.

जाहिरात
079

एबीला टी-20 क्रिकेटचा किंग मानले जाते. RCB संघात कोहलीनंतर एकच मॅच विनर खेळाडू आहे. त्याचे नाव आहे, एबी डिव्हिलियर्स. एबीसाठी हा आयपीएलचा हंगाम शेवटचा असू शकतो. त्यामुळं बंगुळरू संघ हा हंगाम जिंकण्यासाठी सज्ज असेल.

जाहिरात
089

भारतीय क्रिकेट संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल गेली दोन वर्षे आपल्या फिरकीने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळं विराटचा हुकुमी एक्का म्हणून चहलची ओळख आहे.

जाहिरात
099

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमचा भाग असलेल्या युजवेंद्र चहलने आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे मोठी खेळी केली आहे. चहल हा आरसीबीच्या संघाचा एक प्रमुख भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून चहल ज्या पद्धतीने कामगिरी करत राहिला तर आरसीबी नक्कीच विजेतेपदाचा दावेदार असेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या