आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गेल्या हंगामात तळाला असणारा हा संघ यावेळी प्ले ऑफ गाठणार हे निश्चित आहे. शनिवारी राजस्थान विरुद्ध झालेला सामना RCBनं 7 विकेटनं जिंकला.
अबु धाबी, 03 नोव्हेंबर : निर्णायक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरवर (Royal Challengers Bangalore) सहज विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या संघानं हा सामना 6 विकेटनं जिंकला. यासह प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) जागाही मिळवली. दिल्लीचा संघ आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर, बॅंगलोरनं सामना गमावला असला तरी, त्यांनाही प्लेऑफमध्ये जागा मिळाली आहे. बॅंगलोरला एका युवा खेळा़डूमुळे प्लेऑफमध्ये जागा मिळाली. हा खेळाडू आहे देवदत्त पडिक्कल (Devdutt padikkal). RCBने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीविरुद्ध 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. बॅंगलोरकडून सलामी फलंदाज देवदत्तनं 41 चेंडूत 50 धावा केल्या. आयपीएलमधले देवदत्तचे हे पाचवे अर्धशतक होते. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा देवदत्त पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला. देवदत्तच्या या अर्धशतकी खेळीमुळे कर्णधार विराट कोहलीच्या संघाला प्लेऑफ गाठता आले.
देवदत्त 2019मध्येही बॅंगलोर संघासोबत होता. मात्र त्यावेळी त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देवदत्तनं जबरदस्त कामगिरी केली, यामुळेच एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या या फलंदाजाला विराटनं संधी दिली.
यंदाच्या हंगामात देवदत्त बॅंगलोरकडून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 14 सामन्यात 33.72 च्या सरासरीनं 472 धावा केल्या आहेत. या हंगामात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत देवदत्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे केएल राहुल (670) आणि शिखर धवन (525) असे दोन अनुभवी फलंदाज आहेत.