‘हे’ पाच फलंदाज पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला जिंकून देणार IPL.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघ यावेळी पाचव्यांदा चॅम्पियन होण्यास सज्ज आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला या पाच फलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
एवढ्या वर्षात मुंबई संघासाठी सर्वात चिंतेची राहिली आहे ती सलामीची जोडी. मात्र क्विंटन डी कॉकच्या रुपात मुंबईला एक यशस्वी सलामीवीर मिळाला आहे.
क्विंटनने गेल्या हंगामात मुंबईसाठी 16 सामन्यात 529 धावा केल्या. त्यामुळं क्विंटनच्या रुपात मुंबई संघाला एक चांगला सलामीवीर मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना सध्या क्विंटन चांगल्या फॉर्ममध्येही आहे.
मुंबईचा आणखी एक महत्त्वाचा फलंदाज आहे इशान किशन. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या इशानं मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे. 21.06च्या सरासरीनं त्यानं फलंदाजी केली आहे. युवा फलंदाज म्हणून इशानची कामगिरी संघासाठी महत्त्वाची आहे.
गेली 10 वर्ष सूर्यकुमार यादव मुंबई संघासाठी जबदरस्त कामगिरी करत आहे. 3.2 कोटींना विकत घेतलेल्या या खेळाडूंने प्रत्येकवेळी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.
सूर्यकुमारनं 2018मध्ये 500हून अधिक धावा केल्या. सध्या रणजी संघाचा कर्णधार असलेला सूर्यकुमार चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळं त्याच्याकडून रोहितला सगळ्यात जास्त अपेक्षा असतील.
केरेन पोलार्ड हा मुंबईसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत 148 सामने खेळले आहेत. यात त्यानं 2755 धावा तर 56 विकेट घेतल्या आहेत. मुंबईला अनेक सामने पोलार्डनं एकहाती जिंकून दिले आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई संघाने ख्रिस लीनला 2 कोटींना विकत घेतले. त्याची आक्रमकता पाहून मुंबईसाठी लीन नक्कीच उपयोगी ठरेल.
लीनचा टी-20 क्रिकेटमधला स्ट्राईक रेट जवळजवळ 140.65 आहे. त्यामुळं वानखेडेवरती मुंबईच्या चाहत्यांना जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएल 2020मधील सर्वात मजबूत संघ आहे. आतापर्यंत एकूण 4 वेळा मुंबईने विजेतेपद पटकावले आहे. मुंबईच्या विजयामागे सर्वात मोठा हात आहे तो शानदार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माचा.