JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2019 : फायनलनंतर 'हे' खेळाडू झाले मालामाल

IPL 2019 : फायनलनंतर 'हे' खेळाडू झाले मालामाल

विजेत्या मुंबई इंडियन्सला 20 कोटी तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आलं.

0110

आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नईला एका धावेनं पराभूत करून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. मुंबईला ट्रॉफी आणि 20 कोटी रुपयांच बक्षीस मिळालं.

जाहिरात
0210

आठव्यांदा फायनलला पोहोचलेल्या चेन्नईला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यांना 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

जाहिरात
0310

यंदाच्या हंगामात पुनरागमन केलेल्या डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली. त्याने 12 सामन्यात सर्वाधिक 692 धावा केल्या. यात एका शतकासह 8 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले.

जाहिरात
0410

चेन्नईचा सर्वात जास्त वयाचा खेळाडू इम्रान ताहिरने 26 विकेट घेतल्या. पर्पल कॅपचा विजेता ठरलेल्या ताहिरलासुद्धा 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.

जाहिरात
0510

उदयोन्मुख खेळाडू म्हणून कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू शुभमन गिलची निवड करण्यात आली.

जाहिरात
0610

यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याची कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले.

जाहिरात
0710

शेवटच्या सामन्यात पोलार्डने मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची कामगिरी केली. त्याला कॅच ऑफ द सीजन पुरस्कार देण्यात आला.

जाहिरात
0810

आय़पीएलच्या 12 व्या हंगामात 52 षटकार मारणाऱ्या रसेलला सुपर स्ट्राइकरचा पुरस्कार मिळाला. रसेलला हॅरियर कार मिळाली. त्याचसोबत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून रसेलची निवड झाली.

जाहिरात
0910

किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्रिकेटपटू के एल राहुलला स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून पुरस्कार देण्यात आला.

जाहिरात
1010

राहुल चाहरला गेम चेंजर ऑफ द इयरच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या