रांची, 15 फेब्रुवारी : काही महिन्यात सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताने आज आणखी एक तिकीट मिळवले आहे. महिला अॅथलीट भवना जाट ऑलिम्पिक 2020मध्ये पात्रता मिळवली आहे. एवढेच नाही तर राजस्थानच्या भावनाने शनिवारी रांची येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये एक नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदविला, शिवाय सुवर्णपदक जिंकून टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी पात्रता मिळविली. 24 वर्षीय भावनेने महिलांची 20 किमी पायी चालण्याची शर्यत 1: 29.54 तासात पूर्ण केली. ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी 1: 31.00 तासांचा वेळ आवश्यक होता. यावर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक खेळला जाणार आहे.
उल्लेखनीय आहे की भावनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हीच स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 1: 38.30 तासांचा वेळ घेतला होता, ती तिने रांची आपला नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसरीकडे, प्रियांका गोस्वामी या खेळाडूने अवघ्या 0.36 सेकंदासाठी पात्रता गमावली आहे.
ऑलिम्पिक कोटा मिळविल्यानंतर भावनानं, ‘माझे लक्ष्य 1: 28: 1: 29 गेल्या तीन महिन्यांच्या परिश्रमाचा हा परिणाम आहे”, असे सांगितले. भावनाने 2018 मध्ये 2 मिनिटांच्या फरकाने बेबी सौम्याचा रेकॉर्ड मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला होता.