टीम इंडियाची कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणारी क्रिकेटपटू बनली आहे. तिने चार्लोट एडवर्ड्सचा रेकॉर्ड मोडला.
मुंबई, 4 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील (IND W vs ENG W) तिसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 6 विकेट्सनं विजय मिळवला. कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) या विजयाची शिल्पकार होती. तिने नाबाद 75 रन काढले. मितालीच्या या खेळीमुळे टीम इंडियानं व्हाईटवॉश टाळला. (फोटो - Instagram)
मितालीनं 86 बॉलमध्ये 75 रनची निर्णायक खेळी केली. या खेळीत तिने 8 फोर लगावले. मिताली आता महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणारी क्रिकेटपटू बनली आहे. तिने चार्लोट एडवर्ड्सचा रेकॉर्ड मोडला. एडवर्ड्सनं 10 हजार 273 रन काढले होते. (फोटो – AP)
मितालीनं तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. 26 जून 1999 रोजी फक्त 16 वर्ष 205 इतक्या लहान वयात तिने आयर्लंड विरुद्ध पदार्पण केले. वन-डे क्रिकेटमधील पहिल्याच इनिंगमध्ये तिने नाबाद 114 रन काढले होते. (फोटो - Instagram)
इंग्लंड विरुद्ध दिल्लीमध्ये 2005 साली झालेल्या टेस्टमध्ये मिताली भारताकडून सर्वात जास्त रन करणारी खेळाडू बनली. तिने अंजू जैनचा 2,170 रनचा रेकॉर्ड मोडला (फोटो – Twitter)
12 जुलै 2007 रोजी मिताली वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणारी महिला क्रिकेटपटू बनली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीमध्ये तिने हा रेकॉर्ड केला. तसेच वन-डे क्रिकेटमध्ये 6 हजार रनचा टप्पा पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. (फोटो – AP)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्च 2021 रोजी मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केले. (फोटो – AP)
त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 14 मार्च 2021 रोजी मितालीनं वन-डे क्रिकेटमध्ये 7 हजार रनचा टप्पा पूर्ण केला. (फोटो - Instagram)
रन मशिन मितालीनं 3 जुलै 2021 रोजी इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन-डे मॅचमध्ये आणखी एक इतिहास रचला. मिताली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. (फोटो – AP)