JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / टीम इंडियातील 'या' 5 खेळाडूंना मिळतो अपेक्षेपेक्षा कमी पगार, काय आहे नेमकं कारण?

टीम इंडियातील 'या' 5 खेळाडूंना मिळतो अपेक्षेपेक्षा कमी पगार, काय आहे नेमकं कारण?

भारतीय संघातील या पाच खेळाडूंना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतो.

019

क्रिकेट हा सर्वात श्रीमंत खेळ मानला जातो, त्याच बीसीसीआय ही सर्वात श्रीमंत संस्था आहे. त्यानुसार खेळाडूंचे पगारही जास्त असताता. बीसीसीआय खेळाडूंची अ, अ+, बी आणि बी+ अशा गटात विभागणी करते.

जाहिरात
029

बीसीसीआयच्या वतीने अ+ मधील खेळाडूंना 7 कोटी तर इतर गटातील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि एक कोटी असे पगार मिळतात. मात्र भारतीय संघातील या पाच खेळाडूंना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतो.

जाहिरात
039

यात पहिला क्रमांक लागतो तो केएल राहुलचा. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणाऱ्या राहुलनं वर्ल्ड कपमध्ये चांगली फलंदाजी केली. अजूनपर्यंत त्याला कसोटी क्रिकेटमध्ये आपली जागा बनवता आलेली नाही.

जाहिरात
049

मात्र बीसीसीआयच्या विभागणीनुसार राहुलचा ‘ब’ गटात समावेश झाला आहे. त्यामुळं त्याचा पगार 3 कोटी आहे. मात्र त्याची वर्ल्ड कपमधील आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कामगिरी पाहता त्याला ‘अ’ गटात सामिल करण्यात येऊ शकतो.

जाहिरात
059

हार्दिक पांड्या हा सध्याच्या काळात भारतीय संघातील सर्वात यशस्वी ऑलराऊंडर खेळाडू आहे. 25 वर्षांच्या पांड्यानं भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत.

जाहिरात
069

टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा पांड्या अजूनही बीसीसीआयच्या ‘ब’ गटातच आहे. दरम्यान लवकरच त्याचा समावेश थेट अ+ गटात होऊ शकते.

जाहिरात
079

मोहम्मद शमीला गेल्या वर्षी ब गटातून अ गटात सामिल करण्यात आले होते. वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेत जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या शमीनं टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान लवकरच त्याचा समावेश थेट अ+ गटात होऊ शकते.

जाहिरात
089

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रवींद्र जडेजा लढला. एवढेच नाही तर त्यानं कसोटी क्रिकेटमध्येही आपली जागा बनवली आहे. पण जडेजाला बीसीसीआयच्या वेतनात अ गटात स्थान मिळालेले नाही.

जाहिरात
099

भारताचा भरवशाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं टीम इंडियाला अनेक एकहाती विजय मिळवून दिले आहेत. मात्र, त्याचा समावेश अ गटात गेल्या वर्षी करण्यात आला. मात्र येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भुवनेश्वर कुमारला संधी मिळाल्यास त्याला अ+ गटात स्थान मिळू शकते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या