JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ...आणि श्रेयस अय्यरसह टीम इंडियाची यंग ब्रिगेड झाली 'स्ट्रीट डान्सर', VIDEO VIRAL

...आणि श्रेयस अय्यरसह टीम इंडियाची यंग ब्रिगेड झाली 'स्ट्रीट डान्सर', VIDEO VIRAL

भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-0 मालिकेत भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यापासून टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं किवींवर आपले वर्चस्व ठेवले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन, 01 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-0 मालिकेत भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यापासून टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं किवींवर आपले वर्चस्व ठेवले. तर, तिसऱ्या-चौथ्या सामन्यात सुपर ओव्हरच्या थरारात बाजी मारली. टीम इंडियाने मालिका विजय मिळवला असला तरी, न्यूझीलंडला 5-0ने क्लिन स्वीप देण्यासाठी आता केवळ एका विजयासाची गरज आहे. दरम्यान, चौथा सामन्याच सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. यात केएल राहुल आणि विराट कोहलीनं सुपर ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून दिला. या रोमहर्षक विजयानंतर टीम इंडिया सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहे. यातच श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला. यात टीम इंडियाचे खेळाडू एका इंग्रजी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यावर चहलनं, “मैदानाबाहेरही आमचा चांगला परफॉरमन्स”, असे कॅप्शन दिले आहे.

सुपर ओव्हरचा थरार सुपर ओव्हरमध्ये भारताने जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू दिला. पहिल्या चेंडूवर सेफर्टने एक धावा काढली, यावेळी श्रेयस अय्यरनं कॅच सोडला. तर दुसऱ्या चेंडूवर सेफर्टने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर बुमराहच्या शॉट बॉलवर सेफर्टला बाद करण्याची संधी होती. मात्र केएल राहुलनं हा कॅच सोडला. चौथा चेंडूवर वॉशिग्टन सुंदरने सीमारेषेवर चांगला कॅच घेतला. पाचव्या चेंडूवर रॉस टेलरने चौकर मारला. सहाव्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यामुळं भारताला 14 धावांचे आव्हान मिळालं. तत्पूर्वी, न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये दिलेल्या 14 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुलने पहिल्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्यानंतर विराटने चौथ्या चेंडूवर दोन आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. यासह मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या