JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / India vs New Zealand 1st T20 : विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना

India vs New Zealand 1st T20 : विराटसेनेचा विजयी शुभारंभ! टीम इंडियानं 6 विकेटनं जिंकला सामना

न्यूझीलंड-भारत यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेटनं हा सामना जिंकला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऑकलंड, 24 जानेवारी : न्यूझीलंड-भारत यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेटनं हा सामना जिंकला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. केएल राहुलनं केलेल्या 56 धावांच्या आक्रमक खेळीनंतर श्रेयस अय्यर (58) आणि मनीष पांडे (14) यांनी फिनीशरची भुमिका बजावली. न्यूझीलंडने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर रोहित शर्मा 7 धावा करत बाद झाला. त्यानंतर केएल राहुल (56) आणि विराट कोहली (45) यांनी शतकी भागीदारी करत या आव्हानाच्या जवळ भारताला पोहचवले. मात्र राहुल आणि कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं 29 चेंडूत 58 नााबाद धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

संबंधित बातम्या

भारतीय संघ: रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी. न्यूजीलंड: केन विलय्मसन (कर्णधार) , मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कजेलेजिन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट , हामिश बेनेट, ईश सोढ़ी, टिम साउदी, ब्लेयर टिकनेर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या