JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराटला 'मतलबी' व्हायची गरज, वॉनचा सल्ला

IND vs ENG : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराटला 'मतलबी' व्हायची गरज, वॉनचा सल्ला

भारतात यावर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) टीम इंडियाला जिंकायचा असेल, तर विराट कोहलीला (Virat Kohli) थोडं मतलबी व्हायची गरज आहे, असा सल्ला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने (Michael Vaughan) दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मार्च : भारतात यावर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) टीम इंडियाला जिंकायचा असेल, तर विराट कोहलीला (Virat Kohli) थोडं मतलबी व्हायची गरज आहे, असा सल्ला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने (Michael Vaughan) दिला आहे. कोहलीने इनिंगच्या सुरूवातीला स्वत:ला थोडा वेळ दिला पाहिजे. सेट होण्यासाठी त्याने कमीत कमी 10 बॉल खेळावे. जर त्याला 3-4 बॉलवर रन करता आली नाही, तरी तो पुढे एक-दोन बाऊंड्री मारून याची भरपाई करू शकतो. यानंतर कोहलीला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही, असं मायकल वॉन म्हणाला. ‘मला कोहलीच्या बॅटिंगमध्ये काहीही अडचण वाटत नाही. तो कधीच फॉर्ममध्ये नसल्याचं दिसत नाही. पण त्याच्या डोक्यात सध्या काहीतरी सुरू आहे, जे योग्य नाही. असं असलं तरी जुना विराट कोहली पुन्हा दिसायला फक्त 10-15 बॉलची गरज आहे. जलद रन बनवण्यासाठी त्याने जास्त धोका पत्करणं योग्य नाही,’ अशी प्रतिक्रिया मायकल वॉनने दिली. कोहली शून्यवर आऊट विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये (India vs England) शून्य रनवर आऊट झाला. लेग स्पिनर आदिल रशीदने कोहलीची विकेट घेतली. रशीदने टाकलेला बॉल मिड ऑफच्या वरून मारताना विराटने विकेट गमावली. कर्णधार म्हणून विराट 14व्या वेळा शून्य रनवर आऊट झाला. याचसोबत त्याने सौरव गांगुलीचं 13 वेळा शून्यवर आऊट व्हायचा विक्रम मोडला. विराट त्याच्या मागच्या 5 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 3 वेळा शून्यवर आऊट झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये शेवटच्या चार इनिंगमध्ये विराटचा स्कोअर 0, 62, 27, 0 एवढा होता. विराटने शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 साली केलं होतं. बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्टमध्ये विराटने 136 रनची खेळी केली होती. यानंतर वनडे, टेस्ट आणि टी-20 मध्ये विराटला एकही शतक करता आलेलं नाही. यादरम्यान त्याने 13 टी-20, 7 टेस्ट आणि 12 वनडे खेळल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या