JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND vs ENG : 11 विकेट घेत जगातला सगळ्यात 'घातक' बॉलर बनला अक्षर

IND vs ENG : 11 विकेट घेत जगातला सगळ्यात 'घातक' बॉलर बनला अक्षर

भारताचा डावखुरा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) याने टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार पाऊल टाकलं आहे.

0105

भारताचा डावखुरा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) याने टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार पाऊल टाकलं आहे. करियरच्या दुसऱ्याच टेस्टमध्ये अक्षर पटेल जगातला सगळ्यात घातक बॉलर झाला आहे. अहमदाबादमध्ये 11 विकेट घेत अक्षरने अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली आहेत. (PTI)

जाहिरात
0205

अक्षर पटेलने अहमदाबादच्या डे-नाईट टेस्टमध्ये एकूण 11 विकेट घेतल्या. डे-नाईट टेस्टमध्ये एवढ्या विकेट घेणारा अक्षर पटेल जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. अक्षर पटेलने पहिल्या इनिंगमध्ये 38 रन देऊन 6 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 32 रन देऊन 5 विकेट मिळवल्या. (Photo- AFP)

जाहिरात
0305

अक्षर पटेल इंग्लंडविरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये पाच विकेट घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. अक्षर पटेलआधी लक्ष्मण शिवरामाकृष्णन, रविचंद्रन अश्विन यांनी हे रेकॉर्ड केलं आहे. (Photo- Axar Patel)

जाहिरात
0405

आपल्या करियरच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये तीनवेळा पाच विकेट घेणारा अक्षर पटेल दुसरा भारतीय बॉलर बनला आहे. याआधी नरेंद्र हिरवानी यांनी हा कारनामा केला होता. (Axar Patel/Instagram)

जाहिरात
0505

अक्षर पटेलने 4 इनिंगमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत, त्याची सरासरी 9.44 इतकी आहे, तर स्ट्राईक रेट 25.8 एवढा आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सगळ्यात चांगली बॉलिंग सरासरी आणि स्ट्राईक रेट असलेला (15 पेक्षा जास्त विकेट घेणारा बॉलर) बॉलर अक्षर पटेल बनला आहे. (Axar Patel/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या