JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND vs ENG : सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून Virat Kohli एक पाऊल दूर

IND vs ENG : सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून Virat Kohli एक पाऊल दूर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बऱ्याच काळापासून शतक करता आलेलं नाही. पण इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाशी बरोबरी करू शकतो.

0105

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बऱ्याच काळापासून शतक करता आलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट शतकांचा दुष्काळ दूर करून सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाशी बरोबरी तसंच रिकी पॉण्टिंगलाही मागे टाकू शकतो.

जाहिरात
0205

विराट कोहलीने त्याचं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केलं होतं. जर कोहलीला पुण्यातल्या पहिल्या वनडेमध्ये शतक करता आलं तर त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड होऊ शकतात. एक शतक करताच विराट कोहली भारतात सर्वाधिक वनडे शतक करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

जाहिरात
0305

वनडे क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक शतकं आहेत. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं केली आहेत, तर विराटच्या नावावर 43 शतकं आहेत. याशिवाय विराट कोहली कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू ठरेल आणि रिकी पॉण्टिंगला मागे टाकेल.

जाहिरात
0405

सध्या विराट कोहली आणि रिकी पॉण्टिंगच्या नावावर कर्णधार म्हणून 41 शतकं आहेत. वनडे सीरिजमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन ओपनिंगला खेळतील. टी-20 सीरिजमध्ये भारताने पाच ओपनिंग जोड्या वापरल्या.

जाहिरात
0505

वनडेमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्मापेक्षा चांगली ओपनिंग जोडी नाही, असं विराट म्हणाला. मागच्या काही वर्षांमध्ये या दोघांनी शानदार कामगिरी केली आहे. जून 2019 पासून शिखर 9 वनडे खेळला आहे. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो फार क्रिकेट खेळला नाही. धवनने मागच्या 7 इनिंगमध्ये 46.85 च्या सरासरीने 2, 36, 74, 96, 74, 30 आणि 16 रन केले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या