आता पुन्हा क्रिकेटला सुरूवात होत असून, हा आठवडा चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण या आठडव्यात 6 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.
2020 सर्वांसाठी जणू एक वाईट स्वप्न होते. कोरोना व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले. क्रिकेट स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या. दरम्यान, आता पुन्हा क्रिकेटला सुरूवात होत असून, हा आठवडा चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. कारण या आठडव्यात 6 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.
26 नोव्हेंबरपासूल लंका टी-20 लीगला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कोलंबो किंग्ज आणि कॅंडी टस्कर्स यांच्यात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना 16 डिसेंबर रोजी होईल.
तर, 27 नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन संघात 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
तर, 27 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून यांच्यातही तीन टी-20 सामने होणार आहेत.
दुसरीकडे तब्बल 9 महिन्यांनंतर भारतीय संघ क्रिकेट खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौरा करत असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामनाही 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वन-डे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅच खेळणार आहे.