JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचा 'धर्म' काढला

BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचा 'धर्म' काढला

बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांच्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत केलेल्या एका ट्विटमुळे टीका करण्यात येत आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राजीव शुक्ला यांनी हे ट्विट केलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी : बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांच्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत केलेल्या एका ट्विटमुळे टीका करण्यात येत आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राजीव शुक्ला यांनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये राजीव शुक्ला यांनी भारतीय टीमच्या खेळाडूंचा धर्म काढला आहे. राजीव शुक्ला यांनी एक फोटो ट्विट केला ज्यात, ‘एक हिंदू आणि दुसरा मुसलमान. दोघांनाही भारताचा विजय झाल्याचा आनंद आहे. जर देशातल्या जनतेलाही ही गोष्ट समजली तर कट्टर मुस्लिम आणि हिंदू धर्माच्या नावावरून सुरू असलेलं काही पक्षांचं राजकारणच संपून जाईल,’ असं राजीव शुक्ला म्हणाले.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

यानंतर राजीव शुक्ला यांनी दुसरं ट्विट केलं. ‘ऋषभ पंत हिंदू, मोहम्मद सिराज मुस्लिम, शुभमन गिल शीख, वॉशिंग्टन सुंदर ख्रिश्चन. या सगळ्यांनी मिळून भारताला विजय मिळवून दिला. हे दोन मेसेज मला माझ्या मित्राने पाठवले आहेत, तुमचं मत काय?’ असा प्रश्न राजीव शुक्लांनी या ट्विटमध्ये विचारला. राजीव शुक्ला यांच्या या ट्विटनंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. क्रिकेटला धर्माशी जोडण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. तर दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरबाबत चुकीची माहिती पोस्ट केल्यामुळे त्यांच्यावर टीकाही हत आहे. वॉशिंग्टन सुंदर हा तामीळनाडूच्या हिंदू कुटुंबात जन्माला आला. सुंदरच्या वडिलांनी त्यांच्या प्रशिक्षकांचं नाव वॉशिंग्टन असल्यामुळे मुलाचंही तेच नाव ठेवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या