मेलबर्न, 27 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (India vs Australia) टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने धमाकेदार शतक केलं आहे. टेस्ट क्रिकेटमधलं अजिंक्य रहाणेचं हे 12वं शतक होतं. याचसोबत रहाणेने सचिन तेंडुलकरच्या 21 वर्ष जुन्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. 1999 साली सचिन तेंडुलकरने कर्णधार असताना ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक केलं होतं. त्यानंतर आता रहाणेने हे रेकॉर्ड केलं आहे. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकं 116- सचिन तेंडुलकर (1999) 195 - वीरेंद्र सेहवाग (2003) 169 - विराट कोहली (2014) 147 - अजिंक्य रहाणे (2014) अजिंक्य रहाणेचं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरचं हे दुसरं शतक आहे. या मैदानात दोन शतकं करणारा विनू मंकड यांच्यानंतर रहाणे दुसरा भारतीय खेळाडू आहे. तर मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात शतक करणारा रहाणे पाचवा कर्णधार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. त्यातच मागच्या मॅचमध्ये 36 रनच्या निचांकी स्कोअरवर भारताचा ऑल आऊट झाला होता. त्यामुळे रहाणेपुढे मोठं आव्हान होतं. या मॅचआधी रहाणेने 66 टेस्टच्या 111 इनिंगमध्ये 42.45 च्या सरासरीने 4,245 रन केले. रहाणेचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर 188 रन आहे, तर त्याने 22 अर्धशतकं केली आहेत.