India vs West Indies : कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके झाली असून दोघेही खेळत आहेत.
भारतानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत.
कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके झाली असून दोघेही खेळत आहेत. सध्या भारताकडे 260 धावांची आघाडी आहे.
तिसऱ्या दिवशी कोहली आणि रहाणे यांनी 104 धावांची शतकी भागिदारी केली. यात कोहलीनं 51 तर, रहाणेनं 53 धावा केल्या.
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर 3 बाद 81 अशी अवस्था असताना रहाणे आणि कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला.
या दोघांनी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा चौथ्या क्रमांकासाठी शतकी भागिदारी केली आहे. दोघांनी तब्बल 8 वेळा ही कामगिरी केली आहे.
सचिन आणि सौरव यांच्या जोडीनं चौथ्या विकेटसाठी तब्बल सात वेळा शतकी भागिदारी केली आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांचा क्रमांक लागतो.
कोहली आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर त्यांनी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला आहे.