JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर काय? CSA ने दिली मोठी Update

IND vs SA : टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर काय? CSA ने दिली मोठी Update

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटामध्येच दौरा खेळवला जाणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटामध्येच दौरा खेळवला जाणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रेक्षकांशिवायच सगळे सामने होणार आहेत. दोन्ही टीम बायो-बबलमध्ये राहणार आहेत, असं असलं तरी जर टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, तरीदेखील सीरिज सुरू राहणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शुएब मांजरा यांनी ही माहिती दिली आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. ‘बायो-बबलमध्ये यायच्या आधी जर खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या खेळाडूला 10-14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवलं जाईल. पण बायो-बबलमध्ये आल्यानंतर खेळाडू पॉझिटिव्ह आढळला आणि त्याला कोणताही त्रास होत नसेल, तर त्याला हॉटेलमध्येच क्वारंटाईन केलं जाईल. टीम सदस्याची तब्येत बिघडली तर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येईल. बबलमधला सदस्य पॉझिटिव्ह आला तर आम्ही पुढचे 7 दिवस रोज इतर सदस्यांची चाचणी केली जाईल, पण सीरिज सुरूच राहील,’ असं मांजरा यांनी सांगितलं. ‘जर स्वदेशात परतण्याच्या सीमा बंद केल्या गेल्या तर खेळाडूंना भारतात परत पाठवण्याची परवानगी देण्यात येईल, अशी हमी सरकारने दिली आहे, पण भारत सरकार याबाबत काय करणार, ते आमच्या हातात नाही. आमचा आंतरराष्ट्रीय आणि सहयोग विभाग भारत सरकारसोबत चर्चा करत आहे,’ असं मांजरा म्हणाले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून, दुसरी टेस्ट 3 जानेवारीपासून आणि तिसरी टेस्ट 11 जानेवारीपासून सुरू होईल. यानंतर 19, 21 आणि 23 जानेवारीला तीन वनडे खेळवल्या जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या