JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs AUS : पहिल्या वनडेत पांड्याकडे कर्णधारपद, 2 कसोटी सामन्यांसाठीही संघ जाहीर

IND vs AUS : पहिल्या वनडेत पांड्याकडे कर्णधारपद, 2 कसोटी सामन्यांसाठीही संघ जाहीर

कसोटीत ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडवणाऱ्या जडेजाची वनडे संघात वर्णी लागलीय तर रोहित शर्मा पहिल्या वनडेमध्ये खेळणार नाही.

जाहिरात

hardik pandya

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तर एकदिवसीय सामन्यासाठीही संघ जाहीर झाला आहे. एकदिवसीय सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नसल्याने नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल. त्याच्या अनुपस्थितीत वनडे सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. तर दुखापतीनंतर कमबॅक करत कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या जडेजाचीसुद्धा एकदिवसीय मालिकेसाठी वर्णी लागली आहे. हेही वाचा :  हिटमॅनने 100वी कसोटी खेळणाऱ्या पुजारासाठी केला त्याग, VIDEO VIRAL भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. आता उर्वरित दोन सामने जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी भारताकडे असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघात जयदेव उनादकट आणि उमेश यादव यांना संधी मिळाली आहे. जयदेव उनादकटने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी विश्रांती घेतली होती. आता तो पुन्हा संघात आला आहे. कसोटी संघ रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनादकट हेही वाचा :  जडेजाच्या फिरकीसमोर कांगारुंचे लोटांगण, 6 जण बोल्ड; कपिल देव यांचा विक्रम मोडला वनडे संघ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या