JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : भारताला मिळाला पुजाराचा पर्याय, 165 रन करत टीमला जिंकवलं!

IND vs SL : भारताला मिळाला पुजाराचा पर्याय, 165 रन करत टीमला जिंकवलं!

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या (India vs Sri Lanka) 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला पुढच्या महिन्यात सुरूवात होणार आहे. गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या (India vs Sri Lanka) 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला पुढच्या महिन्यात सुरूवात होणार आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 आणि वनडेनंतर आता टेस्ट टीमचं कर्णधारही करण्यात आलं आहे. तर गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रहाणे आणि पुजारा हे दोघंही सध्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळत आहेत. त्यातच हनुमा विहारीने (Hanuma Vihari) रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शानदार खेळी करत तिसऱ्या क्रमांकावर दावा ठोकला आहे. चेतेश्वर पुजारा भारताकडून याच क्रमांकावर खेळतो. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली टेस्ट 4-8 मार्चला मोहालीमध्ये तर दुसरी टेस्ट 12-16 मार्चला बँगलोरमध्ये होणार आहे. हनुमा विहारीने हैदराबादकडून खेळताना चंडीगढविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर पहिल्या इनिंगमध्ये 134 बॉलमध्ये 59 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 167 बॉलमध्ये 110 रन केले. विहारीने पहिल्या इनिंगमध्ये 8 फोर मारल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 13 फोर आणि एक सिक्स लगावली. या सामन्यात विहारीने एकूण 165 रन केले. हैदराबादने पहिल्या इनिंगमध्ये 347 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 269 रन केले. दुसरीकडे चंडीगढला 216 आणि 183 रनच करता आले, त्यामुळे हैदराबादने हा सामना 217 रनच्या फरकाने जिंकला. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनीही रणजी ट्रॉफीला चांगली सुरुवात केली आहे. मुंबई आणि सौराष्ट्रमधल्या सामन्यात रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये 129 रन केले, पण पुजारा शून्य रनवर आऊट झाला. पण दुसऱ्या इनिंगमध्ये पुजाराने 83 बॉलमध्ये 91 रनची आक्रमक खेळी केली, यात 16 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. हनुमा विहारीची टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी चांगली झाली आहे. 13 टेस्टच्या 23 इनिंगमध्ये त्याने 34 च्या सरासरीने 684 रन केले, यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 111 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. याशिवाय ऑफ स्पिन बॉलिंग करणाऱ्या विहारीने 5 विकेटही घेतल्या आहेत. विहारीची श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये निवड करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या