JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : शिव्या-बाऊन्सर खाऊनही शमी-बुमराहची झुंज, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO

IND vs ENG : शिव्या-बाऊन्सर खाऊनही शमी-बुमराहची झुंज, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला (India vs England 2nd Test) बॅकफूटवर ढकललं आहे.

जाहिरात

शमी-बुमराहकडून इंग्लंडचा करेक्ट कार्यक्रम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 16 ऑगस्ट : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला (India vs England 2nd Test) बॅकफूटवर ढकललं आहे. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाची अवस्था 209/8 अशी झाली होती, पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये नाबाद 89 रनची पार्टनरशीप झाली. नवव्या विकेटसाठी भारताची इंग्लंडमधली ही सर्वोत्तम पार्टनरशीप आहे. याआधी कपिल देव आणि मदन लाल यांनी 1982 साली 66 रनची पार्टनरशीप केली होती. जसप्रीत बुमराहसाठी बॅटिंग करणं सोपं नव्हतं, कारण इंग्लंडच्या बॉलर्सनी त्याला बाऊन्सर टाकले. हे बाऊन्सर बुमराहच्या डोक्याला आणि शरिरावरही आदळले. एवढच नाही तर इनिंगच्या 92 व्या ओव्हरमध्ये मार्क वूडने बुमराहला उद्देशून अपशब्द वापरले, त्यामुळे मैदानातलं वातावरण तापलं होतं. यानंतर जॉस बटलरही बुमराहला काही तरी म्हणाला, यावरून बुमराह नाराज झाला. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही प्रत्युत्तर दिलं. लंचदरम्यान बुमराह आणि शमी जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आले तेव्हा या दोघांचं टीम इंडियाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं.

दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद शमीनेही अर्धशतक केलं. 56 रनवर शमी नाबाद राहिला, तर बुमराहने नाबाद 34 रनची खेळी केली. मोहम्मद शमीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे दुसरं अर्धशतक होतं, तसंच हा त्याचा सर्वाधिक स्कोअरही ठरला. शमीने टेस्ट क्रिकेटमधली दोन्ही अर्धशतकं इंग्लंडविरुद्धच लगावली आहेत. 2014 साली नॉटिंघममध्ये त्याने नाबाद 51 रन केले होते, तेव्हाचा सामना ड्रॉ झाला होता. या सीरिजआधी जसप्रीत बुमराहने 30 इनिंगमध्ये 2 च्या सरासरीने 43 रन केले होते, पण या सीरिजमध्ये बुमराहची बॅट चांगलीच चालली आहे. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 28 रन केले होते. हा त्याचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वोत्तम स्कोअर होता. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये बुमराह शून्य रनवर आऊट झाला होता, पण दुसऱ्या इनिंगमध्ये केलेले 34 नाबाद त्याचा सर्वोत्तम स्कोअर झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या