JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IND Vs AUS: सिडनी टेस्टसाठी महत्त्वाच्या ठरतील या मैदानावरच्या 9 खास गोष्टी

IND Vs AUS: सिडनी टेस्टसाठी महत्त्वाच्या ठरतील या मैदानावरच्या 9 खास गोष्टी

सिडनीतील मैदानावर (SCG) 7 जानेवारीपासून भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) तिसरी टेस्ट मॅच होणार आहे. SCG वर आतापर्यंत दोन देशांमध्ये 12 टेस्ट मॅच झाल्या आहेत.

0108

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातल्या टेस्ट सिरीजमध्ये सुरू आहे. सध्या दोन्ही टीम 1-1 बरोबरीवर असून 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या मॅचआधी या ग्राउंडवर इंडियन टीम आणि त्यांच्या काही रेकॉर्डची माहिती आपण जाणून घेणार आहोत. (PC: AP)

जाहिरात
0208

इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीममध्ये सिडनीच्या(SCG) या मैदानावर आतापर्यंत 12 टेस्ट मॅच झाल्या आहेत. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 5 टेस्ट मॅच जिंकल्या आहेत तर इंडियन टीमने केवळ 1 मॅच जिंकली आहे. उर्वरित सहा मॅच ड्रॉ झाल्या आहेत. (@SCG/Twitter)

जाहिरात
0308

1999-2000 या ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाने इंडियन टीमला एक इनिंग आणि 141 रननी हरवले आहे. तर इंडियन टीमने 1978 मध्ये ऑस्ट्रेलियाला 1 इनिंग आणि 2 रनने पराभूत केले होते. (Steve Waugh/Instagram)

जाहिरात
0408

2003-04 दौऱ्यावेळी सौरव गांगुलीच्या(Saurav Ganguly) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडियन टीमने या ग्राउंडवर आपला सर्वाधिक स्कोअर केला आहे. त्यावेळी इंडियन टीमने 705/7 इतका सर्वोच्च स्कोअर केला होता. (Saurav Ganguly/Instagram)

जाहिरात
0508

इंडियन टीमच्या वतीने या ग्राउंडवर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने सार्वधिक 758 रन बनवले आहेत. तर सध्याच्या टीममधील विराट कोहली(Virat Kohli) याने या ग्राउंडवर सर्वाधिक 248 रन काढल्या आहेत. (Sachin Tendulkar Instagram)

जाहिरात
0608

या ग्राउंडवर सर्वाधिक रन केलेल्या प्लेअरमध्ये चेतेश्वर पुजारा(Chetwshwar Pujara) याचे देखील नाव आहे. तो आताच्या भारतीय संघात आहे. त्यामुळे या मॅचमध्ये इंडियन टीमला याचा फायदा होणार आहे. मागील दौऱ्यात त्याने 193 रन केले होते. त्याआधी तेंडुलकर(Sachin Tendulkar) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या ग्राउंडवर अनुक्रमे 241 आणि 206 रन बनवले आहेत. (PIC: AP)

जाहिरात
0708

सिडनीच्या या ग्राउंडवर इंडियन टीमच्या कुलदीप यादव(Kuldeep Yadav) याने एका कसोटी सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. 2018-19 च्या दौऱ्यात त्याने या ग्राउंडवर खेळलेल्या एकमेव टेस्ट मॅचमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. (Kuldeep yadav/Instagram)

जाहिरात
0808

इंडियन टीमच्या वतीने या ग्राउंडवर विकेटकिपर रिषभ पंत(Rishabh Pant) याने सर्वाधिक स्कोअर केला आहे. 2018-19 च्या दौऱ्यात त्याने 159 रनची खेळी केली होती. (PIC: AP)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या