स्टीव स्मिथ नाही हा तर 'सुपरमॅन'! हवेत पकडलेला कॅच पाहून सर्वच झाले अवाक Video
मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या वनडे मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर होत असलेल्या या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघ 26 ओव्हरमध्ये केवळ 117 धावा करून सर्वबाद झाला. एकामागोमाग एक विकेट गेल्याने भारताने विजयासाठी ऑस्ट्रेलिया समोर केवळ 118 धावांचे सोपे आव्हान ठेवले. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने घेतलेला एक कॅच पाहून सर्वच अवाक झाले. कर्णधार स्टीव स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. अशातच मैदानावर स्टीव स्मिथचा ‘सुपरमॅन’ अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव, के एल राहुल यांची एकामागोमाग विकेट गेल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजीची बाजू सावरण्यासाठी हार्दिक पांड्या मैदानावर आला. परंतु एक धाव काढल्यानंतर तो शॉन अॅबॉटच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. शॉन अॅबॉटने टाकलेल्या बॉलवर हार्दिकने फटका मारताच स्टीव स्मिथने हवेत उडी मारून त्याची कॅच पकडली.
स्टीव स्मिथचा कॅच पकडण्यासाठी सुपरमॅन सारखा अंदाज पाहून सर्वचजण अवाक झाले. यापूर्वी देखील अनेकदा स्टीव स्मिथने असे अवघड कॅच पकडले आहेत. स्टीव स्मिथने पकडलेल्या या कॅच चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.