JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानला वर्ल्ड कप खेळावाच लागेल; कारण, 283 कोटी अन् चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद

पाकिस्तानला वर्ल्ड कप खेळावाच लागेल; कारण, 283 कोटी अन् चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद

आशिया कपवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची भाषाही केली. मात्र बीसीसीआय आणि आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला वनडे वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकणं शक्य नाही.

जाहिरात

icc world cup

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जुलै : एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आयसीसीची डरबनमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष जका अशरफ हे एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवा अशी मागणी करणार आहेत. पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आशिया कपवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची भाषाही केली. मात्र बीसीसीआय आणि आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला वनडे वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकणं शक्य नाही. वर्ल्ड कप ही स्पर्धा आयसीसीकडून भरवली जाते. जर पाकिस्तानने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला तर त्यांच्याकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद काढून घेतलं जाऊ शकतं. 2025 मध्ये होणाऱ्या आय़सीसी ट्रॉफीचे यजमानपद त्यांना मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये मोठ्या स्पर्धांचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यास तयार आहे. The Ashes : डेव्हिड वॉर्नरचा टेस्ट क्रिकेटला अलविदा, पत्नीच्या पोस्टनंतर शिक्कामोर्तब! आयसीसी प्रत्येक क्रिकेट बोर्डाला निधी देते. पाकिस्तान या निधीवर अवलंबून आहे. पुढच्या चार वर्षात आयसीसीकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 283 कोटी रुपये मिळणार आहेत. जर वर्ल्ड कपबाबत ते अडून बसले तर त्यांना ही रक्कम गमवावी लागेल. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला सर्वाधिक रक्कम मिळते. श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेक वर्षे तिथे क्रिकेटचे सामने झाले नाहीत. आता हळू हळू परदेशी संघ पाकिस्तानमध्ये जात आहेत. अशा परिस्थितीत वर्ल्ड कपबाबत जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर इतर देश नाराज होऊ शकतात. आशिया कप पाकिस्तानमध्ये खेळवण्याबाबत श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशनेही त्यांची बाजू घेतली नाही. पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान माजरी यांनी असा दावा केला की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्थापन केलेल्या विशेष समितीच्या सदस्यांनाही वाटतं की भारताच्या पाकिस्तान दौरा न करण्याच्या भूमिकेवर कठोर निर्णय घ्यायला हवा. भारत आशिया कपसाठी त्यांचा संघ पाकिस्तानमध्ये पाठवत नसेल तर मला वाटतं की, वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या संघाचे सामने तटस्थ ठिकाणी व्हावेत. भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटत असेल तर आम्हीही भारतात आमच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करू शकतो. आयसीसीने एकदिवसीय वर्ल्ड कपचं शेड्युल जारी केलं आहे. यातील सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 ठिकाणी सामने होणार असून 48 सामने होणार आहेत. तर पाकिस्तान 5 ठिकाणी खेळणार आहे. यातील काही ठिकणांबाबत पाकिस्तानने प्रश्न उपस्थित केले आहेत. एकदिवसीय वर्ल्ड कपमधील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या