JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS WI : दीप्ती शर्माने गाठला 100 विकेट्सचा पल्ला, अवघ्या 25 व्या वर्षी केली ही कामगिरी

IND VS WI : दीप्ती शर्माने गाठला 100 विकेट्सचा पल्ला, अवघ्या 25 व्या वर्षी केली ही कामगिरी

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताची स्टार क्रिकेटर दीप्ती शर्मा हिने कमाल करून दाखवली आहे. दीप्तीने वयाच्या 25 व्या वर्षी टी 20 क्रिकेटमध्ये तब्बल 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

जाहिरात

IND VS WI : दीप्ती शर्माने गाठला १०० विकेट्सचा पल्ला; अवघ्या २५ व्या वर्षी केली कमाल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताची स्टार क्रिकेटर दीप्ती शर्मा हिने कमाल करून दाखवली आहे. दीप्तीने वयाच्या 25 व्या वर्षी टी 20 क्रिकेटमध्ये तब्बल 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दीप्तीने 3 विकेट घेऊन आपल्या विकेट्सची सेंचुरी पूर्ण केली. दीप्तीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 89 टी 20 सामने खेळले असून 100 विकेट घेतल्या आहेत. दीप्ती ही भारताची अनुभवी अष्टपैलू खेळाडू असून तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात 2014 सालापासून केली होती. तिने  बंगळुरू येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शर्माची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी 6-20 आहे जी तिने रांची येथे श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात केली होती.

सोमवारी पारपडलेल्या महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये दीप्ती शर्मा हिला आपल्या संघात घेण्यासाठी लीगमधील पाचही संघांमध्ये चुरस होती. परंतु अखेर 2.16 कोटी इतकी बोली लावून युपी वोरीअर्सने तिला खरेदी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या