JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूवर सूर्याचा इफेक्ट, त्या शॉटचा Video Viral

पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूवर सूर्याचा इफेक्ट, त्या शॉटचा Video Viral

सूर्यकुमार यादव फलंदाजी करताना कोणता चेंडू कुठल्या दिशेने टोलवेल हे कोणीच सांगू शकत नाही. अनेक फलंदाज सध्या सूर्याची ही स्टाईल कॉपी करताना दिसतात. सूर्याचा हाच इफेक्ट पाकिस्तानच्या महिला फलंदाजांवरही असल्याचे कालच्या सामन्यात पहायला मिळाले.

जाहिरात

सूर्याचा हाच इफेक्ट पाकिस्तानच्या महिला फलंदाजांवरही असल्याचे कालच्या सामन्यात पहायला मिळाले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी : रविवारी झालेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. काल झालेला सामना हा दोन्ही संघांच्या महिला क्रिकेटपटूंनमध्ये खेळवण्यात आला असला तरी या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या फलंदाजीच्या स्टाईलची झलक पहायला मिळाली. सूर्यकुमार यादव याच्या फलंदाजीच्या स्टाईलमुळे चाहत्यांनी ‘Mr 360’ हे नाव दिले आहे. सूर्यकुमार फलंदाजी करताना कोणता चेंडू कुठल्या दिशेने टोलवेल हे कोणीच सांगू शकत नाही. अनेक फलंदाज सध्या सूर्याची ही स्टाईल कॉपी करताना दिसतात. सूर्याचा हाच इफेक्ट पाकिस्तानच्या महिला फलंदाजांवरही असल्याचे कालच्या सामन्यात पहायला मिळाले. हे ही वाचा  : हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर; राजस्थानमध्ये करणार शाही विवाह पाकिस्तानच्या एका खेळाडूने सूर्याच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत पाकिस्तानी खेळाडूने विकेटच्या मागे एक अजब शॉट खेळला. रविवारी भारत पाक यांच्यातील क्रिकेट सामन्यात पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महारूफने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तानची फलंदाज सिद्रा अमीनने ही भारतासमोर मोठ्या धाव संख्येच आव्हान ठेवण्यासाठी चांगली खेळी करीत होती. यावेळी तिने सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये एक शॉट खेळला. तिने खेळलेल्या या शॉटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरु असताना 10व्या ओव्हरमध्ये शेफाली वर्मा गोलंदाजी करत असताना चौथ्या बॉलवर अमीन स्ट्राइकवर होती. या बॉलवर ती ऑफ साइडच्या दिशेने तिच्या विकेटच्या मागे गेली आणि मिड-ऑनच्या दिशेने हलकाच चेंडू टोलवला. तिचा हा शॉट पाहून प्रेक्षकांना सूर्यकुमार यादवची आठवण आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या