JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / ICC चं क्रिकेट फॅन्सना गिफ्ट, दुबईतील बैठकीत वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय

ICC चं क्रिकेट फॅन्सना गिफ्ट, दुबईतील बैठकीत वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय

आयसीसीच्या (ICC) मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यावेळी पुढील 8 वर्षातील फ्यूचर टूर्स प्रोग्रॅम (FTP) तयार करण्यात आला आहे.

0106

दुबई, 2 जून : आयसीसीच्या (ICC) मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यावेळी पुढील 8 वर्षातील फ्यूचर टूर्स प्रोग्रॅम (FTP) तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयला थोडा दिलासा देण्यात आला आहे. या बैठकीतील काही निर्णयाचा क्रिकेट फॅन्सना आनंद होणार आहे. (फोटो – AFP)

जाहिरात
0206

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 2024 ते 2031 दरम्यान 4 T20 वर्ल्ड कप होणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये 20 टीम सहभागी होतील. त्याचबरोबर 2 वन-डे वर्ल्ड कपचे आयोजन केले जाईल. यामध्ये 14 टीम खेळणार आहेत. त्याचबरोबर या काळात 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) होणार आहेत. (फोटो – AFP)

जाहिरात
0306

2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 55 मॅच होतील. तर वन-डे वर्ल्ड कपमध्ये 54 मॅच होणार आहेत. पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये दोन गटांमध्ये प्रत्येकी सात टीमचा समावेश असेल. यापैकी टॉप तीन टीम 'सुपर सिक्स'मध्ये प्रवेश करतील. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल होतील. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये हाच फॉरमॅट होता. टी20 वर्ल्ड कपमध्ये चार गटात प्रत्येकी पाच टीमचा समावेश असेल. प्रत्येक गटातील टॉप 2 टीम सुपर 8 मध्ये जातील. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल होतील. (फोटो – AFP)

जाहिरात
0406

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता 2025 साली ही स्पर्धा पुन्हा एकदा होणार आहे. त्यानंतर 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाईल. (फोटो – AFP)

जाहिरात
0506

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि आयसीसी महिला स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच निश्चित केले आहे. (फोटो – AFP)

जाहिरात
0606

आयसीसीच्या बैठकीत या काळातील पुरुष, महिला आणि अंडर 19 स्पर्धेचे यजमान निश्चिती प्रक्रियेलाही मान्यता दिली आहे पुरुषांच्या स्पर्धेचे यजमान सप्टेंबर महिन्यात निश्चित होतील. तर महिला आणि अंडर 19 स्पर्धेचे यजमानांची ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात निवड होणार आहे. (फोटो – AFP)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या