JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC T20 World Cup: क्रिकेट चाहत्यांना धक्का, टी-20 वर्ल्ड कपबाबत आली सर्वात मोठी बातमी

ICC T20 World Cup: क्रिकेट चाहत्यांना धक्का, टी-20 वर्ल्ड कपबाबत आली सर्वात मोठी बातमी

कोव्हिड-19मुळं आयसीसीच्या वतीनं ही स्पर्धा आता तब्बल दोन वर्ष म्हणजेच 2022पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 28 मे रोजी आयसीसीच्या वतीनं बैठक घेण्यात येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 27 मे : कोरोनामुळं सध्या जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळं आता ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही धोक्यात आली आहे. कोव्हिड-19मुळं आयसीसीच्या वतीनं ही स्पर्धा आता तब्बल दोन वर्ष म्हणजेच 2022पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 28 मे रोजी आयसीसीच्या वतीनं बैठक घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2021मध्ये भारताला याआधीच टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद देण्यात आलं आहे. एका वर्षात एकाच स्वरूपाचे दोन विश्वचषक नियोजित करणं अनुचित आहे. सध्याची परिस्थिती पाहता सहा महिने आयसीसी कोणताही मोठी स्पर्धा आयोजित करण्याच्या विचारात नाही आहे. दरम्यान या निर्णयामुळं क्रिकेट प्रेमींना आणि होस्ट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सना मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर भारतात ऑक्टोबरमध्ये आयपीएलचे आयोजन केले तर 6 महिन्यात 2 आयपीएल आणि 2021मध्ये 2 वर्ल्ड कप यांचे आयोजन करणं कठिण होईल. त्यामुळेच आयसीसीच्या वतीनं टी-20 वर्ल्ड कपला 2022पर्यंत स्थगिती दिली जाऊ शकते. त्यामुळं ही स्पर्धा रद्द होणार नाही तर पुढे ढकलली जाऊ शकते. तसेच, 2022मध्ये कोणत्याही मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले नाही आहे. (ही बातमी अपडेट होत आहे)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या