JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC ODI WC 2023 : अहमाबादमध्ये भारत-पाक सामना, चाहते रुग्णालयात शोधतायत बेड; कारण काय?

ICC ODI WC 2023 : अहमाबादमध्ये भारत-पाक सामना, चाहते रुग्णालयात शोधतायत बेड; कारण काय?

अहमदाबादमध्ये चाहत्यांनी चक्क रुग्णालयात बेड शोधायला सुरुवात केलीय. त्यातही अशा रुग्णालयांचा शोध घेतला जात आहे जिथे नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल.

जाहिरात

अहमदाबादमध्ये होणार भारत-पाक सामना

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 22 जुलै : आयसीसी वनडे वर्ल्ड कप यंदा भारतात होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या सामन्यासाठी चाहत्यांचा उत्साह सध्या दिसून येत आहे. अहमदाबादमध्ये चाहत्यांनी चक्क रुग्णालयात बेड शोधायला सुरुवात केलीय. त्यातही अशा रुग्णालयांचा शोध घेतला जात आहे जिथे नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल. अहमदाबाद शहरातील रुग्णालयात काम करणारे डॉक्टर पारस शहा यांनी अहमदाबाद मिररशी बोलताना म्हटलं की, हे एक रुग्णालय असून इथं पूर्ण बॉडी चेकअपासाठी पूर्ण रात्र थांबण्यासाठी अपॉइंटमेंट घेत आहेत. यामुळे त्यांचे दोन्ही उद्देश पूर्ण होतील. हे लोक डिलक्स ते सुइट रूमसुद्धा बूक करत आहेत. आमच्याकडे मर्यादीत खोल्या आहेत. आम्ही एनआरआयना प्राधान्य देत आहे आणि त्यातही रुग्णांची देखभाल करणं हे आमचं कर्तव्य आहे. 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 18व्या वर्षी निवृत्ती; कोण आहे आयशा? डॉक्टर पारस शहा यांनी सांगितले की, माझ्या अमेरिकेतील मित्रांनी इथं रुग्णालयात राहण्याबद्दल विचारलं. माझ्याकडे स्पेशल आणि जनरल अशा दोन खोल्या आहेत. त्यांचा उद्देश भारत-पाक सामना पाहणं आणि वैद्यकीय सुविधांचा लाभ घेणं हा आहे. त्यांना माझ्या घराऐवजी रुग्णालयात रहायचंय. रिपोर्टनुसार, अहमदाबादमध्ये खोल्यांच्या किंमती १५ ऑक्टोबरला २० पट वाढल्या आहेत. एका रुमसाठी ५९ हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहेत. अमहादाबादमध्ये आयटीसीचे वेलकमहॉटेल ७२ हजार रुपये घेत आहेत. तर १५ ऑक्टोबरला शहरातील टीसी नर्मदा, कोर्टयार्ड बाय मेरियट यांसारख्या इतर हॉटेलमध्ये खोल्या मिळत नाहीयेत. यामुळेच चाहत्यांनी रुग्णालयांकडे मोर्चा वळवला असल्याची चर्चा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्याशिवाय अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. तर १९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या