साखळी सामन्यात आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता.
ICC Cricket World Cupमध्ये सुरुवातीपासून चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं धक्का दिला. सेमीफायनलमध्ये केलेल्या खराब कामगिरीमुळं भारतानं हा सामना 18 धावांनी गमावला. त्याचबरोबर भारताचे वर्ल्ड कपमधले आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, आयपीएल सारखे बदल आयसीसीनं केले असते तर, भारत फायनलमध्ये पोहचू शकला असता.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं आयसीसीनं भविष्यात नॉकआऊटमध्ये आयपीएलसारखे प्ले ऑफ सामने खेळवण्याची विनंती केली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर विराट कोहलीला वर्ल्ड कपमध्ये काही बदल करण्याबाबत विचारले असता, आयपीएलमधला एक नियम आयसीसीनं लागू करावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
भारतीय संघ साखळी सामन्यात 7 सामने जिंकत पहिल्या क्रमांकावर होता. त्यामुळं जर आयपीएलसारखा नियम लागू झाला असता, तर फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताकडे आणखी एक संधी उपलब्ध असती.
आयपीएलमध्ये पहिल्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाला आणखी एक संधी मिळते. असे असले तरी, विराटनं सेमीफायनलच्या लढतीची एक वेगळी मजा असते, असेही मत व्यक्त केले.