मुंबई, 29 जुलै : एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा जवळ आली असून याचे सामने 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. दरम्यान, टी20 वर्ल्ड कपबाबत मोठी बातमी समोर येतेय. टी20 वर्ल्ड कपचे सामने पुढच्या वर्षी वेस्ट वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहेत. हे सामने 4 ते 30 जूनपर्यंत होऊ शकतात. पहिल्यांदाच या वर्ल्ड कपमध्ये 20 संघांना संधी मिळेल. आतापर्यंत 15 संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. अमेरिकेत पहिल्यांदा आयसीसी स्पर्धा होत असून संघही वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, टी२० वर्ल्ड कपचे सामने ४ ते ३० जूनपर्यंत खेळवले जाऊ शकतात. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत १० ठिकाणी हे सामने होतील. अमेरिकेत फ्लोरिडा, मॉरिसविले, डलास आणि न्यूयॉर्कची निवड यासाठी केल्याचं समजते. आयसीसीचे पथक लवकरच या ठिकाणचा दौरा करणार आहे. अनेक रिपोर्टमध्ये असाही दावा केला जात आहे की, अमेरिकेत अद्याप स्ट्रक्चर तयार नाही, त्यामुळे वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होऊ शकतो. पंचांनी षटकारही दिला, पण त्याच चेंडूवर फलंदाज झाला बाद, पाहा VIDEO टी२० वर्ल्ड कपमध्ये २० संघांना प्रत्येकी ५-५ संघांच्या ग्रुपमध्ये विभागलं जाईल. साखळी फेरीनंतर चार ग्रुपमधील टॉप २ संघ सुपर ८ मध्ये जातील. सुपर ८ मध्ये ४-४ संघांचे दोन ग्रुप केले जातील. प्रत्येक ग्रुपमधील २ संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. आता यात भारत-पाकिस्तान कोणत्या ग्रुपमध्ये असतील हे पाहण औत्सुक्याचं असेल. २०२४ पासून २०३१ पर्यंत आयसीसी ८ जागतिक स्पर्धांचे आय़ोजन करणार आहे. यामध्ये टी२० वर्ल्ड कप ही मोठी स्पर्धा असेल. टी२० वर्ल्ड कपसाठी आतायपर्यंत यजमान वेस्ट इंडिज, अमेरिकेशिवाय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी हे पात्र ठरले आहेत. सप्टेंबरमध्ये अमेरिकेत क्लालिफायर सामने होतील. तिथे आणखी दोन संघ पात्र ठरतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आशियातून दोन संघ पात्र ठरतील. तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आफ्रिकेत क्वालिफायर सामन्यांमधून एक संघ वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरेल.