वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं असून क्रिकेट जगताला नवा विजेता मिळणार आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सेमीफायनलमध्ये एका धावेवर बाद झाला असला तरी त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वांना मागं टाकलं आहे. त्याला एका वर्ल्ड कपमध्ये सचिनचा विक्रम मोडता आला नसला तरी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. आता दोन फलंदाज त्याला मागे टाकू शकतात.
रोहित शर्माने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 648 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नर 647 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचेही आव्हान संपुष्टात आल्यानं आता वॉर्नर रोहित शर्माला मागे टाकू शकणार नाही.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 606 धावा केल्या आहेत.
इंग्लंडचा जो रूट चौथ्या स्थानावर आहे. जो रूटनं 549 धावा केल्या आहेत. त्याला सेमीफायनलमध्ये रोहित शर्माचा 648 धावांचा टप्पा ओलांडता येईल.
2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला रोहितला मागे टाकण्याची संधी आहे. पण त्यासाठी शतक करावे लागेल. केन विल्यम्सनच्या 548 धावा झाल्या आहेत .
ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना सुरू आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळं दोन्हीपैकी कोणीही जिंकलं तरी क्रिकेटला नवा जग्गजेता मिळणार आहे.