वेस्ट इंडिजने उभारलेला 321 धावांचा डोंगर 51 चेंडू शिल्लक ठेवत बांगलादेशने सर केला.
ICC Cricket World Cup 2019ची बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना रोमांचक ठरला. या सामन्यात पुन्हा एकदा बांगलादेशचा संघ जायंट किलर ठरला, त्यांनी वेस्ट इंडिजला 7 विकेटने पराभूत केले. वेस्ट इंडिजने उभारलेला 321 धावांचा डोंगर 51 चेंडू शिल्लक ठेवत बांगलादेशने सर केला. बांगलादेशसाठी शाकीब अल हसनने नाबाद 124 धावा केल्या. त्याला साथ देत लिट्टन दासने नाबाद 94 धावा केल्या. या सामन्यात अनेक विक्रम तोडले गेले. टाकूया त्यावर एक नजर
बांगलादेश वर्ल्ड कप मधला पहिला संघ ठरला आहे, ज्या संघाने 320 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य तब्बल 2 वेळा पार केले आहे.
वर्ल्ड कपच्या इतिहासात आव्हानाचा पाठलाग करताना मिळवलेला हा दुसरा मोठा विजय आहे. बांगलादेशने 322 धावांचे आव्हान 41.4 ओव्हर मध्येच पूर्ण केले.
बांगलादेशने पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे.