JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / World Cup : Point Table : भारताविरुद्ध पराभवाने पाकिस्तानला झटका, पुढची वाटचाल कठीण!

World Cup : Point Table : भारताविरुद्ध पराभवाने पाकिस्तानला झटका, पुढची वाटचाल कठीण!

ICC Cricket World Cup 2019 : India vs pakistan : भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागल्याने वर्ल्ड कपमधील त्यांची पुढची वाट बिकट होण्याची शक्यता आहे.

0107

ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली. भारताने चारपैकी तीन सामने जिंकले तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.

जाहिरात
0207

सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. दोघांचे अनुक्रमे 8 आणि 7 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत.

जाहिरात
0307

भारताच्या विजयाने इंग्लंड चौथ्या स्थानावर गेले आहे. लंकेला पाचपैकी दोन सामन्यात पावसाने दणका दिला तर दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे स्पर्धेत त्यांचे 4 गुण झाले आहेत.

जाहिरात
0407

लंकेनंतर सहाव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. त्यांचे तीन गुण झाले असून त्यांना पाचपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांच्यानंतर सातव्या स्थानी बांगलादेश असून त्यांचेसुद्धा 3 गुण झाले आहेत. बांगलादेशने 4 सामने खेळले असून त्यात एक विजय दोन पराभव आणि एक सामना पावसाने रद्द झाला.

जाहिरात
0507

पाकिस्तानला भारताविरुद्धच्या पराभवाने गुणतक्त्यात सातव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. त्यांचे पाच सामन्यात 3 पराभव झाले असून केवळ एक विजय मिळवता आला आहे. त्यांचाही एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

जाहिरात
0607

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला अद्याप खाते उघडता आलेलं नाही. चारपैकी चार सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील पुढची वाटचाल कठीण झाली आहे.

जाहिरात
0707

पाकिस्तानचे पुढचे सामने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी होणार आहेत. यात त्यांचा एका सामन्यात जरी पराभव झाला तरी त्यांचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात येऊ शकते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या