कोल्हापूर, 16 जून : ICC Cricket World Cupच्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. मात्र, असे असले तरी, सध्या जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मॅंचेस्टरमधील हवामान महत्त्वाचे आहे. कारण याच शहरातील ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून भारतीय संघाला पोवाड्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.