पाच वर्षात प्रथमच रन आऊट झाली हरमनप्रीत! मैदानातून परतताना फेकली बॅट
मुंबई, 24 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनलचा पहिला सामना पारपडला. या सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव झाला असून यामुळे भारताचं महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न पुन्हा भंग पावलं. परंतु भारताला विजय मिळून देण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने खूप प्रयत्न केले. परंतु धाव काढताना मध्येच बॅट अडकल्याने ती रन आउट झाली आणि हाच भारताचा या मॅच मधील टर्निंग पॉईंट ठरला. भारताची महिला कर्णधार हरमनप्रीत कौर ही आजारी असल्याने सेमीफायनल सामन्यात खेळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. परंतु ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सेमीफायनल सामन्यात हरमनप्रीत मैदानात उतरली.
स्मृती मानधना, शफाली वर्मा यासारखे स्टार फलंदाज बाद झालयावर हरमनप्रीतने जबाबदार कर्णधारासारखी खेळी केली. तिने 52 धावा केल्या, परंतु धाव काढत असताना तिची बॅट मातीत अडकली आणि क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन विकेटकिपरने तिला रन आउट केले.
सेमीफायनल सामन्यात भारत संकटात असताना हरमनप्रीतचा असा रन आउट सर्वांच्याच जिव्हारी लागला. विशेष म्हणजे हरमनप्रीत ही गेल्या पाच वर्षात प्रथमच रन आउट झाली. अशापद्धतीने बाद झाल्याने हरमनप्रीतचा संताप अनावर झाला. तिने रागात आपली बॅट फेकून दिली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.