JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / T20 World Cup : एरॉन फिंच, एमएस धोनी आणि दुबई.... तिघांमध्ये आहे खास कनेक्शन!

T20 World Cup : एरॉन फिंच, एमएस धोनी आणि दुबई.... तिघांमध्ये आहे खास कनेक्शन!

टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव केला. यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) एरॉन फिंच, एमएस धोनी (MS Dhoni) आणि दुबईचं खास कनेक्शन सांगितलं.

0106

टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. याआधी कांगारूंनी पाचवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताचा बॉलर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ऑस्ट्रेलिया, चेन्नई सुपर किंग्स आणि दुबईमध्ये शानदार कनेक्शन सांगितलं.

जाहिरात
0206

टी-20 वर्ल्ड कपच्या महिनाभर आधी दुबईच्या याच मैदानात आयपीएल 2021 (IPL 2021 Final) ची फायनल झाली होती. या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला होता.

जाहिरात
0306

एका महिन्यात दुबईच्याच मैदानात चॅम्पियन झालेल्या दोन्ही टीमच्या जर्सीचा रंग पिवळा आहे.

जाहिरात
0406

2021 मध्ये पिवळा हा मोसमाचा रंग आहे. एकाच ठिकाणी पिवळ्या रंगाच्या जर्सी घालून दोन टीमचा विजय झाला, असं ट्वीट हरभजनने केलं. याचसोबत हरभजनने ऑस्ट्रेलिया आणि चेन्नईच्या टीमचा फोटोही पोस्ट केला.

जाहिरात
0506

हरभजन सिंगला मात्र या ट्वीटमुळे ट्रोल करण्यात आलं. वर्ल्ड कप आणि आयपीएलची तुलना नको, वर्ल्ड कप खूप मोठा आहे, असं एकाने हरभजनला सांगितलं.

जाहिरात
0606

तू अजून आयपीएलमध्येच जगत आहेत, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकलाय, असं म्हणत आणखी एका यूजरने हरभजनवर निशाणा साधला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या