टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग नाशिकमध्ये (Harbhajan Singh at Nashik) आला होता. त्र्यंबकरोडवरच्या गावरान स्टाईल हॉटलेमध्ये हरभजनने स्वत: चुलीवरचं जेवणं बनवलं, यानंतर त्याने या जेवणाचाही आस्वाद घेतला.
भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) नाशिकमध्ये आला होता. हरभजनचे नाशिकमधले काही फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तो स्वत:च्या हाताने स्वयंपाक करताना दिसत आहे.
नाशिकच्या त्र्यंबकरोडवरच्या एका गावरान स्टाईल जेवण देणाऱ्या हॉटेलमध्ये हरभजन सिंग आला होता. हरभजनने स्वत:च्या हातने चुलीवर स्वयंपाक केला आणि जेवणाचा आस्वाद घेतला.
त्र्यंबकरोडवरच्या हॉटेल संस्कृतीमध्ये हरभजन आला होता. संस्कृतीमधल्या आपलं गाव, बलुतेदार, पाटीलवाडा, गडकिल्ले आणि गणपती मंदीर पाहून हरभजननं समाधान व्यक्त केलं.
संस्कृतीचे संचालक दिग्विजय शिवाजी मानकर यांनी हरभजनला संस्कृतीच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. हरभजनने त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं.
हरभजन सिंगने पाटील वाडा इथे बसून महाराष्ट्रीय पदार्थांवर ताव मारला. मुख्य म्हणजे महाराष्ट्रीय पद्धतीने हरभजन पाटावर जेवणासाठी बसला.
हरभजन सिंगने क्रिकेटच्या सगळ्या प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. 18 जुलै 2022 ला हरभजनने आम आदमी पक्षाकडून राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली.
भारताने 2007 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 चा वनडे वर्ल्ड कप जिंकला. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात हरभजन सिंगने मोलाची भूमिका बजावली होती.
हरभजन सिंग भारताकडून 103 टेस्ट, 236 वनडे आणि 28 टी-20 मॅच खेळला. यात त्याने टेस्टमध्ये 417, वनडेमध्ये 269 आणि टी-20 मध्ये 25 विकेट घेतल्या. कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक टेस्टमध्ये हरभजनने हॅट्रिक घेतली होती.
आयपीएलमध्येही तो बराच काळ मुंबई इंडियन्ससोबत होता, यानंतर तो चेन्नई सुपर किंग्स आणि केकेआरकडून खेळला. आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या आहेत.