धोनी य़ष्टीमागे असताना फलंदाजाने पाय उचलणं म्हणजे विकेट देण्यासारखंच आहे. जाणून घ्या धोनीच्या अशाच काही खास गोष्टी
धोनी एक यशस्वी कर्णधार म्हणून जसा ओळखला जातो तसाच तो सर्वोत्तम फिनिशर आणि यष्टीरक्षकही आहे. तो य़ष्टीमागे असताना फलंदाजाने पाय उचलणं म्हणजे विकेट देण्यासारखंच आहे. जाणून घ्या धोनीच्या अशाच काही खास गोष्टी
झारखंडमधील रांची शहरात 7 जुलै 1981 ला धोनीचा जन्म झाला. त्याचे कुटुंबीय उत्तराखंडमधून रांचीला आले होते. धोनीनं त्याचं शिक्षणही रांचीत केलं. तिथंच त्याला खेळाची आवड निर्माण झाली.
क्रिकेटमध्ये नावलौकीक कमावलेला धोनी फूटबॉल आणि बॅडमिंटनपटूसुद्धा आहे. त्यानं जिल्हास्तरीय आणि क्लब मॅचेसमध्ये फूटबॉल आणि बॅडमिंटन खेळला आहे.
धोनीने 2001 ते 2003 या कालावधीत रेल्वेत तिकीट चेकरची नोकरीही केली. या काळात क्रिकेटपासून तो काहीसा दुरावला होता. 2004 मध्ये धोनीला इस्ट झोन संघाने त्याला डावलले होते.
सेंट्रल कोल फिल्ड लिमिटेड कडून शीश महल स्पर्धेत खेळताना धोनीला त्याच्या प्रशिक्षकाने प्रत्येक षटकारासाठी प्रशिक्षकांनी 50 रुपये दिले होते.
धोनीने त्याचे रणजी ट्रॉफीत बिहारकडून पदार्पण केलं होतं. 1999-2000 मध्ये त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 68 धावा केल्या होत्या. तर हंगामात 5 सामन्यात 283 धावा केल्या होत्या
धोनीला गाड्यांची प्रचंड आवड आहे. पहिल्यापासून त्याला टु व्हीलर आवडतात. त्याच्याकडे दुर्मीळ अशा गाड्या आहेत. धोनीच्या गॅरेजमध्ये Yamaha RD350, Harley Davidson Fatboy, Ducati 1098, Kawasaki Ninja H2 या गाड्या आहेत. यात अशाही गाड्या आहेत ज्या दक्षिण आशियामध्ये कोणाकडेही नाहीत.
धोनी फलंदाजी करताना त्याचा हेलिकॉप्टर शॉट पाहण्याची चाहत्यांची इच्छा असते. एकदा मुलाखतीत बोलताना धोनीने या शॉटला त्याच्या मित्राने टेनिस बॉल स्पर्धेत हेलिकॉप्टर शॉट नाव दिल्याचं सांगितलं होतं.
धोनी फलंदाजी करताना त्याचा हेलिकॉप्टर शॉट पाहण्याची चाहत्यांची इच्छा असते. एकदा मुलाखतीत बोलताना धोनीने या शॉटला त्याच्या मित्राने टेनिस बॉल स्पर्धेत हेलिकॉप्टर शॉट नाव दिल्याचं सांगितलं होतं.
कसोटी क्रिकेटमधून धोनीने 2014 मध्ये निवृत्ती घेतली. त्याआधी त्याने 90 सामन्यात 6 शतके आणि 33 अर्धशतकांसह 4 हजार 876 धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली.
आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने त्याच्या नेतृत्वाखाली जिंकली.
धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 27 कसोटी विजय मिळवले आहेत. तर याआधी गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 21 कसोटी जिंकल्या होत्या. याशिवाय एकदिवसीय आणि टी20 मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनुक्रमे 110 आणि 41 सामने जिंकले आहेत.
जगात 3 कर्णधारांनी 100 पेक्षा जास्त एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग आणि अॅलन बॉर्डरनंतर धोनीचा तिसरा क्रमांक लागतो.
आयपीएलमध्ये आठवेळा फायनलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने प्रवेश केला आहे. तर तीनवेळा विजेतेपद पटकावलं आहे.
धोनीने 4 जुलै 2010 मध्ये साक्षीसोबत लग्न केलं. साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं असून ती कोलकत्त्यात ट्रेनी म्हणून काम करत होती. आपले खासगी आयुष्य धोनीने माध्यमांपासून दूर ठेवलं आहे. लग्नसुद्धा अगदी साधेपणानं आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केलं.
धोनीने 2017 मध्ये 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं ही खेळी केली होती. कोणत्याही भारतीयाकडून हे सर्वात महागडं अर्धशतक ठरलं.
धोनी जॉन अब्राहमचा चाहता असून त्यानं लांब केसही ठेवले होते. जेव्हा जॉन अब्राहमने केस कमी केले तेव्हा धोनीनेसुद्धा केस कमी केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा धोनी तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी 500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
वर्ल्ड कपबाबत बोलायचे झाल्यास धोनीनं 8 वेळा आयसीसी स्पर्धेत सहभागी झाला होता. तर पाच वेळा कर्णधार म्हणून त्याची निवड झाली आहे.
नीला सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्याला सैन्याकडून मानद लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आलं आहे. तो एकदा म्हणाला होता की, माझं देशावर आणि त्यानंतर कुटुंबीय आणि मग पत्नी.
धोनीला 2009मध्ये क्रिकेटमधील उल्लेखनीय कार्यासाठी भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. 2007-08चा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारही त्याला मिळाला होता. 2018मध्ये धोनीला पद्मभुषण पुरस्कार बहाल करण्यात आला.