मुंबई, 06 जून : भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हा आपल्या शांत स्वभावासाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आज अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane Birthday) आज 32वा वाढदिवस आहे. या मराठमोळ्या क्रिकेटपटूनं आपल्या विशेष शैलीसह भारतीय संघात आपली एक वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र रहाणेचा प्रवास तेवढा सोपा नव्हता. डोंबिवली ते टीम इंडिया या त्याच्या प्रवासावर अजिंक्य रहाणेनं दिलेलं उत्तर वाचून स्वप्न खरी होतात, यावर तुमचा विश्वास बसेल, 2011मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अजिंक्यने कित्येकदा भारतीय संघाला एकहाती सामने जिंकून दिले. त्यामुळेच रहाणे हा भारतीय संघातील एक भरवशाचा खेळाडू आहे. मात्र रहाणेचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक संघर्ष राहणेला करावे लागले. एका कार्यक्रमात रहाणेनं आपला संघर्षमय प्रवास सांगितला.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्यने आपल्या क्रिकेट करिअरचे श्रेय आपल्या आईला दिले. रहाणेनं आपल्या संघर्षाबद्दल सांगताना, “आम्ही डोंबिवलीला राहायचो. त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळं मी आणि आई रोज सात-आठ किमी चालत जायचो”, रहाणे भावुक झाला होता. अजिंक्यने आईचा त्याच्या करिअरमागे मोठा हात असल्याचं सांगत, आईच्या मी आणि माझा भाऊ दोघांना घेऊन जायची शाळेत. आम्ही खुप मस्ती करायचे, पण तरी आईने कधी रागराग केला नाही, असे सांगितले.
आई-वडिलांना दिले श्रेय अजिंक्य रहाणेनं आपल्या करिअरबाबत सांगताना, “मी सात वर्षांच्या असल्यापासून क्रिकेटचा सराव करतोय. पण या काळात सगळ्यात जास्त मला कोणी पाठिंबा दिला असेल तर ते माझे आई-बाबा. क्रिकेट प्रॅक्टिससाठी सीएसएमटीला जायचो तेव्हा पहिल्या दिवशी बाबासोबत होते. पण त्यानंतर त्यांनी मला स्वावलंबी केले. मला डोंबिवली स्टेशनला सोडून ते निघून जायचे. त्या दिवसापासून मी एकटाच प्रवास करायचो”, असे मत व्यक्त केले.