JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेटच्या मैदानात हार्ट अटॅक येताच खाली कोसळला, 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात हार्ट अटॅक येताच खाली कोसळला, 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

जाहिरात

२० वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 16 जुलै : कमी वयातही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. व्यायाम करताना, चालता चालता, खेळताना तरुण जागीच कोसळून मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता गुजरातमध्ये अवघ्या २० वर्षांच्या तरुणाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडली. गुजरातच्या अरावली इथं तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीच्या मोडासा इथं गोवर्धन सोसायटीतील तीर्थ अपार्टमेंटमध्ये पर्व सोनी हा राहत होता. क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पर्व सोनी हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेलंगनाच्या नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना मृत्यू झाला होता. त्याचं वय फक्त १९ वर्षे इतकं होतं. तर तेलंगनातच हैदराबादमध्ये जिममध्ये वर्कआउट करताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. वर्ल्ड कपआधी भारतासाठी 3 गूडन्यूज, दोन गोलंदाज फिट, एक फलंदाजही करणार पुनरागमन हैदराबादमध्ये याआधी एका लग्नात नवरदेवाला हळद लावताना एक व्यक्ती अचानक खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. तर एक जण चालता चालता रस्त्यावरच कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने ट्राफिक पोलिसांनी सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला होता. याआाधी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका क्रिकेट सामन्यावेळी जीएसटी कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्ये हा सामना होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर पडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या