गुजरात जाएंट्सने फिट खेळाडूला दाखवला बाहेरचा रास्ता? नक्की काय आहे प्रकरण
मुंबई, 5 मार्च : काल पासून भारतात महिला प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात खेळवण्यात आला होता. सलामी सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात संघाचा तब्बल 143 धावांनी दारुण पराभव करून गुजरातला मोठा धक्का दिला. परंतु सामन्यात पराभव होण्याआधीच गुजरात संघातील एका महिला खेळाडूला दुखापतीच कारण देत महिला आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले. परंतु आता यावर बरेच सवाल उपस्थित होत आहेत. वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डेएन्ड्रा डॉटिन ही WPL मधून बाहेर पडली आहे. काल सामन्यापूर्वी गुजरातने याबाबत माहिती देत डेएन्ड्रा डॉटिन हिला दुखापत झाल्याचे म्हंटले होते. परंतु डेएन्ड्रा डॉटिनने स्वतः ट्विट करून याबाबत खुलासा केला आहे. मात्र वेस्ट इंडिजच्या खेळाडूने दिलेलं हे कारण सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे.
गुजरात संघाने डेएन्ड्रा डॉटिन ही दुखापतग्रस्त असल्याचे सांगितल्यानंतर सर्वजण तिला “Get Well Soon” लवकर बरी हो असे संदेश पाठवत होते. परंतु डेएन्ड्रा डॉटिनने यांना उत्तर देताना नक्की कशातून बरी होऊ? (Get Well Soon but from what?) असा प्रश्न विचारला. नंतर तिने सविस्तर ट्विट करत म्हंटले, “माझ्यासाठी पाठवण्यात आलेल्या सर्व संदेशांचे मी खरोखरच कौतुक करते. पण खरे सांगायचे तर मी कशातून नाही तर मी पवित्र आत्मातून वर येत आहे”.
डेएन्ड्रा डॉटिनने ही दुखापतग्रस्त नव्हती मग गुजरात संघाने खोटे कारण देत असे का म्हंटले. असा प्रश्न आत सर्वांनाच पडला आहे. गुजरातने डॉटिनला WPL लिलावात 60 लाख रूपये देऊन खरेदी केले होते. गुजरातने आता डॉटिनच्या जागी आता किम ग्राथला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली