JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जोकोविच नंबर वन! फ्रेंच ओपनवर कोरलं नाव, 23 वे ग्रँड स्लॅम जिंकून केला विक्रम

जोकोविच नंबर वन! फ्रेंच ओपनवर कोरलं नाव, 23 वे ग्रँड स्लॅम जिंकून केला विक्रम

नोवाक जोकोविचने २४ वर्षीय कॅस्पर रुडला फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पराभूत करत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पॅरिस, 11 जून : दिग्गज टेनिस स्टार नोवाक जोकोविचने 24 वर्षीय कॅस्पर रुडला फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पराभूत करत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. यासह त्याने 23 व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरलं. यासह त्याने राफेल नडालला मागे टाकलं. याआधी नडाल आणि जोकोविच यांनी प्रत्येकी 22 ग्रँडस्लॅम जिंकली होती. टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने चौथ्या क्रमांकावरील रुडला सरळ सेटमध्ये हरवलं.  7-6 (7-1), 6-3, 7-5 अशा फरकाने सामना जिंकत फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं. या विजयासह त्याने इतिहास घडवला असून सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे. चार ग्रँड स्लॅममध्ये किमान तीन विजेतेपद पटकावणारा जोकोविच एकमेव टेनिसपटू बनला. एका दशकात टीम इंडिया बनली चोकर्स; 9 ICC स्पर्धेत गमावल्या 4 फायनल अन् 4 सेमीफायनल जोकोविचने सेमीफायनलमध्ये अल्कारेजला हरवलं होतं. अल्कारेजचा 6-3, 5-7, 6-1, 6-1  अशा फरकाने पराभव केला होता. तर रुडने सेमीफायनलमध्ये जेवेरेवला 6-3, 6-4, 6-0  सरळ सेटमध्ये हरवलं होतं. गेल्या वर्षीही रूड फायनलमध्ये पोहोचला होता.  पण त्याला पराभूत व्हावं लागलं होतं. दुसऱ्या बाजूला नोवाक जोकोविचला इतर ग्रँड स्लॅमच्या तुलनेत फ्रेंच ओपनमध्ये यश मिळालं नव्हतं. त्याला दोन वेळाच विजेतेपद मिळालं होतं. आता तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकली.

नडालला टाकलं मागे पुरुष एकेरीत आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम नोवाक जोकोविचच्या नावावर नोंद झाला. त्याने 23 ग्रँड स्लॅम जिंकली असून दुसऱ्या क्रमांकावर राफेल नडाल आहे. नडालने 22 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत. तर रॉजर फेडरर 20 ग्रँड स्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या