File Photo
मुंबई, 8 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये अश्विनच्या निवडीसोबतच टीम इंडियाने आणखी एक सुखद धक्का दिला आहे. एमएस धोनीची टीम इंडियाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2007 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. याचसह 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. यानंतर मात्र भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. आता पुन्हा एकदा धोनीची टीममध्ये एण्ट्री झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
भारतीय टीमविराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर